‘परिवर्तनाची सुरवात स्वयंसुधारणेपासून होणे गरजेचे’
समाजातील कोणत्याही परिवर्तनाची सुरुवात ही व्यक्तिगत स्वतःपासूनच झाली पाहिजे. मानसिक स्वच्छता आणि इतरांप्रती आदर यातून पुढे बाह्य स्वच्छताही साध्य होईल, असे प्रतिपादन ‘विश्वकल्याण गुरु सेवा फाऊंडेशन’चे संचालक व प्रख्यात प्रेरक वक्ते विनायक छत्रे यांनी येथे केले. शाश्वततेचे विविध पैलू आणि आपले शहर स्वच्छ आणि शाश्वत ठेवण्यासाठी या पैलूंचे सामान्य माणसासाठी असलेले महत्व, याचा शोध घेण्यासाठी ‘अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह’तर्फे (एपीसीसीआय) नुकतेच 'क्लीन सिटी टॉक्स' ही चर्चासत्रांची विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात श्री. छत्रे यांच्या ‘शाश्वतता आणि नेतृत्व’ या विषयावरील भाषणाने झाली. याप्रसंगी ‘एपीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, आणि लीड व्हॉलेंटियर सत्या नटराजन उपस्थित होते. विनायक छत्रे हे एक प्रख्यात प्रेरक वक्ते असून पुण्यात सिद्ध समाधी कार्यक्रम सुरु करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, तसेच शिक्षकांसाठी असलेल्या प्रशिक्षण उपक्रमातही ते सहभागी आहेत. ते ‘फोर्बाको सिस्टम्स ...