कचरा वर्गीकरण या जागतिक आव्हानाकडे दुर्लक्ष नको
कचऱ्याच्या संदर्भामध्ये आपला एक नेहमी प्रश्न असा असतो की कचऱ्याचे करायचं काय ? ज्या वेळेला एखाद्या वस्तूचा वापर संपतो किंवा ती वस्तू निरुपयोगी होते तेव्हा आपण त्याचा कचरा झाला असे म्हणतो. पण हाच कचरा किंवा अशाच निरुपयोगी वस्तू जर सुस्थितीत सांभाळल्या गेल्या, ठेवल्या,साठवलेल्या गेल्या तर दुसरे कोणते तरी उत्पादन बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरता येऊ शकतो.उदा.ओला कचरा वेगळा ठेवला गेला आणि तो प्रक्रिया प्रकल्पामध्ये गेल्यावर ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत किंवा बायोगॅस तयार करता येऊ शकते. ओला कचऱ्यामध्ये प्लास्टिक,धातू,काच असे प्रकारचे न कुजणारे किंवा ज्याच्यापासून पुढचे उपपदार्थ तयार होत नाहीत असा कचरा मिसळला गेला तर प्रकल्पामध्ये कंपोस्ट खत किंवा बायोगॅस तयार होऊ शकत नाही. त्यामुळे प्रकल्प बंद पडतात व अपेक्षित असा परिणाम आपल्याला मिळत नाही आणि अपेक्षित अशा नवीन उत्पादनाची निर्मिती देखील होत नाही.तसेच प्लास्टिकचे सुद्धा आहे.प्लास्टिक कचरा हा एक विशिष्ट समस्या निर्माण करतो. प्लास्टिकचे वर्गीकरण किंवा विलगीकरण योग्य रीतीने केले तर प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याच्या भरपूर सोयी उप...