घरगुती दैनंदिन कृती नद्यांच्या परिसंस्थांचे जतन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात
नदीशी संबंधित जवळजवळ सर्व प्रमुख समस्यांचे मूळ म्हणजे लोकांचा नदीशी संपर्काचा अभाव असल्याचे मत जीवित नदी - लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशनच्या संस्थापक संचालक डॉ.शैलजा देशपांडे यांनी व्यक्त केले.आपण सर्वजण एकत्र येऊन वैयक्तिक योगदान दिले तर नदीच्या परिसंस्थांचे रक्षण करणे शक्य आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्सच्या पाचव्या सत्रात त्यांनी एपीसीसीआयच्या कार्यालयात येऊन स्वच्छता सैनिक व तरूण स्वयंसेवकांशी संवाद साधला.शाश्वतता आणि नेतृत्वाबाबत विविध पैलू आणि आपले शहर अधिक राहण्यायोग्य कसे बनवता येईल याबाबत तज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी क्लीन सिटी टॉक्सचे आयोजन केले जाते. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर,मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे आणि लीड वॉलेंटियर सत्या नटराजन आदी मान्यवर उपस्थित होते.वर्तुळ या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या व फीट कव्हर 360 या मॅरेथॉन आयोजक संस्थेच्या तरुण स्वयंसेवकांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. जीवितनदी या उपक्रमाची सुरूवा...