पुण्यातील स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायचंय? जाणून घ्या कसे सहभागी होता येईल!
90 च्या दशकापर्यंत पेन्शनर्सचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे आज देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांपासून ते ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सपर्यंत, आयटी कंपन्यांपासून ते स्टार्टअप्स आणि प्रगत होत जाणाऱ्या पायाभूत सुविधा - या सर्व गोष्टींमुळे पुणे भारताच्या विकासाचे प्रतीक बनले आहे. मात्र झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणासोबत काही आव्हानेही येतात, आणि त्यामध्ये एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे विकासासोबत आपल्या शहराची स्वच्छता राखणे. शहरीकरणात वेगाने वाढणारा ओला, सुका, प्लास्टिक किंवा इलेक्ट्रॉनिक रूपातील कचरा आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने याचा सामना कसा करतो ही केवळ स्थानिक सरकारची जबाबदारी नसून आपल्या सर्वांची देखील आहे. पुणेकर आणि पर्यावरणप्रेमी आपल्या शहराच्या वारशाबद्दल जागरूक आहेत. शहरासाठी त्यांना काही तरी करायचे असते, परंतु अनेकांना कुठून सुरूवात करायची हे माहीत नसतं! खरं तर, शहरातील टेकड्या, वारसास्थळे आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी सहभागी होण्याचे अनेक मार्ग आहेत. ते खालीलप्रमाणे - 1. क्रॉनिक स्पॉट किंवा दीर्घकालीन कचरा साठले...