झीरो वेस्ट मॅरेथॉन्सच्या दिशेने
मॅरेथॉन्स या पुण्याच्या फिटनेस संस्कृतीचा अविभाज्य घटक झाल्या आहेत. काही लोकं स्पर्धात्मक दृष्टीने जिंकण्यासाठी सहभागी होतात,तर काही लोकं तंदुरूस्तीच्या दृष्टीने भाग घेतात.अशा प्रकारच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असून शेकडो,हजारो लोकं सहभागी होतात. याशिवाय रस्ते,टेकड्या आणि तलाव यांची एक सुंदर भौगोलिक पार्श्वभूमी पुणे व आसपासच्या परिसराला लाभली आहे.रनिंग ग्रुप्स पासून ते कॉर्पोरेट कंपन्या, रूग्णालये व इतर संस्था असे सगळे मॅरेथॉन्स,सायक्लोथॉन्स आणि वॉकथॉन्ससारख्या उपक्रमांचे आयोजन करून तंदुरूस्तीबरोबरच सामाजिक संदेश देखील देत असतात.ही संस्कृती यापुढेही वाढत जाणार आहे आणि पुण्यातील फिटनेस प्रेमींसाठी अनेक उपक्रम घेऊन येईल.पण अशा उपक्रमांशी निगडीत काही आव्हाने देखील असतात आणि त्यातील एक प्रमुख आव्हान म्हणजे कचरा व्यवस्थापन.जगभरात हवामान बदल हे एक गंभीर वास्तव्य झाले असताना शाश्वततेसाठी कचरा व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब बनली आहे.अशा उपक्रमां मधून शून्य कचरा (झीरो वेस्ट) हेच उद्दिष्ट असून शाश्वततेच्या दृष्टीने निर्णायक आणि महत्त्वाचे पाऊल ठरू शकते....