'माझी वारी स्वच्छ वारी' स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायत , स्वयंसेवी संस्थांचा सत्कार
पालखी प्रस्थान झाल्यानंतर पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर 'माझी वारी स्वच्छ वारी' या स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायत , स्वयंसेवी संस्थां, तसेच पुणे महानगर पालिका, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या प्रतिनिधींचा एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला . अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे मांजरी रोड येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय सभागृहात सर्व सहभागी संस्थांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संथश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवस्थान, देहू चे अध्यक्ष ह.भ.प श्री. पुरषोत्तम मोरे महाराज यांसह पीएमसी च्या घनकचरा विभागातील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे , अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे, एपीसीसीआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे , एपीसीसीआय चे लिड व्हॉलेंटिअर सत्या नटराजन आणि संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या माझी वारी स्वच्छ वारी या उ...