माझी वारी स्वच्छ वारी मोहिमेला चांगला प्रतिसाद
१३५० हून अधिक स्वयंसेवक,अनेक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या सांघिक कार्यामुळे 1 जुलै ते 4 जुलै या चार दिवसांच्या कालावधीत ८६.५ टन सुका कचरा गोळा करण्यात आला. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या माझी वारी स्वच्छ वारी या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर सुमारे 125 किमी रस्ता पालखी प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आला. यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी बरोबरच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी,उरुळी कांचन, कदमवाक वस्ती, वडकी, सासवड, दिवे काळेवाडी, येवडे येथील ग्रामपंचायत आणि पुणे महानगरपालिका, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यासह गावांमधील स्वयंसेवक यांच्या सांघिक कार्यातून पालखी मिरवणुकीच्या मार्गांवर काही तासांतच रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविली जाते. यावर्षी स्वयंसेवकांना सहजरित्या कचरा गोळा करून ठेवता यावा यासाठी एपीसीसीआय तर्फे पालखी मार्गावर ग्रीन नेटस बसविण्यात आले. तसेच 140 हून अधिक कचरा वेचक वाहने आणि मशिन स...