पुण्यातील रस्त्यांची स्वच्छता करणारे व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ग्लटन मशिन
शहरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने सहकार्य,नाविन्यपूर्ण उपाय आणि नागरी सहभागाच्या माध्यमातून एक तंत्रज्ञान चलित उपक्रम म्हणून ओळख निर्माण केली आहे.आपल्या विविध उपक्रम आणि आधुनिक यंत्रसामग्रीत सर्वांत लोकप्रिय व लक्ष वेधून घेणारे ठरलेले म्हणजे ग्लटन मशिन आहे. ग्लटन हे एक आटोपशीर व विद्युत यंत्रणेवर काम करणारे कचरावेचक उपकरण (इलेक्ट्रिक व्हॅक्यूम लिटर पिकर )आहे.पुण्याच्या रस्त्यांवर आता ग्लटन सर्वसामान्यपणे दिसते आणि नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण करते. कागदाचे तुकडे,प्लास्टिक यांसह सुका कचरा प्रभावीपणे गोळा करण्यासाठी डिझाईन केलेले ग्लटन मशिन पादचारी मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणांची जलद व कार्यक्षम स्वच्छता करण्यास मदत करते.पारंपरिक झाडलोट पध्दतीपेक्षा वेगळे, हे मशीन सक्शन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक अचूकता आणि वेगाने कचरा उचलते,ज्यामुळे जास्त गर्दीच्या शहरी भागांमध्ये याचा फायदा जास्त दिसून येतो.एपीसीसीआयच्या 275 हून अधिक मशीन्सच्या ताफ्याचा हा एक भाग असून,हे मशीन दररोज शेकडो किलोमीटर परिसराची स्वच्छता करतात आणि कामकाजाची कार्यक...