Posts

Showing posts with the label Pune Youth

पुण्याच्या स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी तरूणाईचा पुढाकार

Image
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात शाश्वत आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तरूणांचा सहभाग दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचा ठरत आहे. जगभरातील बहुतेक शहरी भागांसमोर कचरा व्यवस्थापनाचे आव्हान गंभीर होत आहे.मात्र,या परिस्थितीवर केवळ शांत न राहता,स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाचे महत्त्व ओळखून पुण्यातील तरूण सामाजिक जबाबदारी स्वीकारत शहराच्या हितासाठी योगदान देण्यासाठी पुढे येत आहेत. शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवसात आराम करण्यात न घालवता अनेक तरूण शहरातील विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होत आहेत. डोंगर,टेकड्या,नदीकाठ,रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांपासून विविध परिसरापर्यंत तरूण आणि नव्याने कार्यरत होत असलेल्या सामाजिक संस्था शहरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही केवळ स्थानिक प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. तरूण स्वयंसेवकांचा स्वच्छता मोहिमांमध्ये वाढता सहभाग, शहराबद्दल आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्यामध्ये निर्माण होत असलेल्या जबाबदारीचे उत्तम उदाहरण आहे. या उपक्रमांचा उद्देश केवळ कचरा गोळा करण्यापुरता मर्यादित नाही. कचरा इतरत्र...