पुण्याच्या स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी तरूणाईचा पुढाकार
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात शाश्वत आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तरूणांचा सहभाग दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचा ठरत आहे. जगभरातील बहुतेक शहरी भागांसमोर कचरा व्यवस्थापनाचे आव्हान गंभीर होत आहे.मात्र,या परिस्थितीवर केवळ शांत न राहता,स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाचे महत्त्व ओळखून पुण्यातील तरूण सामाजिक जबाबदारी स्वीकारत शहराच्या हितासाठी योगदान देण्यासाठी पुढे येत आहेत.

शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवसात आराम करण्यात न घालवता अनेक तरूण शहरातील विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होत आहेत. डोंगर,टेकड्या,नदीकाठ,रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांपासून विविध परिसरापर्यंत तरूण आणि नव्याने कार्यरत होत असलेल्या सामाजिक संस्था शहरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही केवळ स्थानिक प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. तरूण स्वयंसेवकांचा स्वच्छता मोहिमांमध्ये
वाढता सहभाग, शहराबद्दल आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्यामध्ये निर्माण होत असलेल्या जबाबदारीचे उत्तम उदाहरण आहे.

या उपक्रमांचा उद्देश केवळ कचरा गोळा करण्यापुरता मर्यादित नाही. कचरा इतरत्र टाकणे,कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि जबाबदारीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत स्वयंसेवकांकडून जनजागृती केली जात आहे. नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे आणि त्याचा दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणे हा या प्रयत्नांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) देखील अशा उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे.विविध स्वच्छता मोहिमा तसेच मॅरेथॉन नंतरच्या स्वच्छता उपक्रमांद्वारे पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करत आहे.
तरूण स्वयंसेवकांचा उत्साह अधिक नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रेरणा देत आहे.त्यांच्या प्रयत्नांतून अर्थपूर्ण बदलाची सुरूवात छोट्या-छोट्या पावलांपासून होऊ शकते हे दिसून येते.
पुणे शहराचा विस्तार आणि विकास सातत्याने होत असताना,शहरातील तरूण नागरिक स्वच्छ,हरित आणि निरोगी भविष्यासाठी दिशादर्शकाची भूमिका बजावत आहेत.