विद्यार्थी परिचय व स्वागत समारंभात (इंडक्शन) कचरा व्यवस्थापनाचा समावेश का आवश्यक आहे ?

एक प्रभावी इंडक्शन (विद्यार्थी परिचय व स्वागत समारंभ) कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या विचारांना योग्य दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील वास्तव जीवनातील आव्हाने,जबाबदाऱ्या आणि संधी समजून घेण्यास मदत करतो. या सुरूवातीच्या संवादातून विद्यार्थी आपल्या शैक्षणिक ज्ञानाला सामाजिक जबाबदारी आणि नागरी जाणीवांशी जोडू लागतात. 


याच दृष्टीकोनातून अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने 25 मार्च 2026 रोजी कीस्टोन स्कुल ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थी इंडक्शन कार्यक्रमात सहभाग घेतला. एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे यांनी अर्बन इंडिया : क्लीनर,ग्रीनर आणि हेल्दीअर या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यांनी प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ,शाश्वत शहरे उभारण्यात नागरिक आणि संस्थांची भूमिका किती महत्त्वाची आहे,हे अधोरेखित केले.
 

इंडक्शन कार्यक्रमात कचरा व्यवस्थापनाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे,कारण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण होते.तसेच विद्यार्थी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता दैनंदिन सवयी,समुदायामध्ये सहभाग आणि माहितीपूर्ण कृती यांद्वारे अधिक निरोगी समाज कसा घडू शकतो हे समजून घेऊ शकतात.अशा उपक्रमांमुळे तरूण पिढीला स्वच्छता,शाश्वतता आणि दीर्घकालीन शहरी विकासाला पाठिंबा देणारे जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रेरणा मिळू शकते.
 
याप्रसंगी कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.संदीप कदम तसेच सागर राजेभोसले,शर्वरी कुलकर्णी,डॉ.विनिता शुक्ला आणि निलेश रामेकर उपस्थित होते. 



Popular posts from this blog

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

Inspiring Collaboration for a Greener Tomorrow