जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

वास्तविक कौशल्य हे प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉलेजच्या प्रवासातील एक अविभाज्य भाग झाला आहे. विविध संकल्पना समजणे,लोकांपुढील समस्या व  गरजा जाणून घेणे,त्यावर व्यावहारीक आणि वापरण्याजोगे उपाय तयार करणे आणि हे करत असताना कौशल्य आत्मसात करणे यामुळे वास्तविक कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.याचाच प्रत्यय डॉ.भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन (बीएनसीए) यांच्या सादरीकरणातून आला.

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्स या सत्रात बीएनसीएच्या विद्यार्थिनी तृप्ती थापा,मोहिनी मांडके,राधिका जोशी व त्यांचे मार्गदर्शक आणि बीएनसीएमधील सहाय्यक प्रा.महेश बांगड यांनी स्वच्छच्या सहकार्याने तयार केलेल्या शहरातील घनकचरा साठवणुकीसाठी पिंजऱ्याच्या मॉडेल डिझाईनचे सादरीकरण केले.

क्लीन सिटी टॉक्सचे हे सहावे सत्र असून नेतृत्व आणि शाश्वततेचे विविध पैलू तज्ञांकडून जाणून घेणे हे याचे उद्दिष्ट आहे.याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर,मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे व लीड वॉलेंटियर सत्या नटराजन उपस्थित होते.
20 विद्यार्थिनींनी तयार केलेला हा पिंजरा सिंहगड रोड येथे बसविला गेला आहे आणि त्याचा वापर स्वच्छता सैनिक करत आहेत.यामध्ये विविध प्रकारचा सुका आणि रिसायकल करण्याजोगा कचरा विविध कप्प्यांमध्ये साठवून ठेवता येतो.

या सादरीकरणामुळे उपस्थित स्वच्छता सैनिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये अशा प्रकारचा उपक्रम पुढे कसा घेऊन जाता येईल यावर उत्साही चर्चा झाली.

एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर  यांनी सातत्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की,हा विद्यार्थ्यांनी सुरू केलेला उपक्रम असल्याने पुढच्या बॅचचे विद्यार्थी यावर अधिक काम करून हा उपक्रम पुढे नेतील,हे सुनिश्चित केले पाहिजे.

आधुनिक शहरी वातावरणात कार्यक्षम,वापरण्यास सोपी आणि आकर्षक डिझाईन विद्यार्थ्यांचा विचारशील दृष्टीकोन दर्शवितो आणि हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.पुढील पिढीतील वास्तुविशारदांकडून समर्पणाचा आणि नवकल्पनांचा अनुभव घेेणे हे खूप आंनददायी आहे,असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



Popular posts from this blog

Environmental Health: Safeguarding Our Future, Sustaining Our Planet

जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व

When young minds take their ideas from ‘Mind to Market’