झीरो वेस्ट मॅरेथॉन्सच्या दिशेने

मॅरेथॉन्स या पुण्याच्या फिटनेस संस्कृतीचा अविभाज्य घटक झाल्या आहेत. काही लोकं स्पर्धात्मक दृष्टीने जिंकण्यासाठी सहभागी होतात,तर काही लोकं तंदुरूस्तीच्या दृष्टीने भाग घेतात.अशा प्रकारच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असून शेकडो,हजारो लोकं सहभागी होतात.याशिवाय रस्ते,टेकड्या आणि तलाव यांची एक सुंदर भौगोलिक पार्श्वभूमी पुणे व आसपासच्या परिसराला लाभली आहे.रनिंग ग्रुप्स पासून ते कॉर्पोरेट कंपन्या, रूग्णालये व इतर संस्था असे सगळे मॅरेथॉन्स,सायक्लोथॉन्स आणि वॉकथॉन्ससारख्या उपक्रमांचे आयोजन करून तंदुरूस्तीबरोबरच सामाजिक संदेश देखील देत असतात.ही संस्कृती यापुढेही वाढत जाणार आहे आणि पुण्यातील फिटनेस प्रेमींसाठी अनेक उपक्रम घेऊन येईल.पण अशा उपक्रमांशी निगडीत काही आव्हाने देखील असतात आणि त्यातील एक प्रमुख आव्हान म्हणजे कचरा व्यवस्थापन.जगभरात हवामान बदल हे एक गंभीर वास्तव्य झाले असताना शाश्वततेसाठी कचरा व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब बनली आहे.अशा उपक्रमांमधून शून्य कचरा (झीरो वेस्ट) हेच उद्दिष्ट असून शाश्वततेच्या दृष्टीने निर्णायक आणि महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

प्रत्येक छोट्या मोठ्या उपक्रमानंतर कचरा हा निर्माण होत असतो.मॅरेथॉनच्या बाबतीत पाण्याच्या बाटल्या,फूड पॅकेटस व इतर ओला व सुका कचरा हे प्रामुख्याने निर्माण होतात.काही साहित्य हे मॅरेथॉनचा एक महत्त्वाचा भाग असतो.त्यामध्ये टी-शर्टस,सर्टिफिकेटस,भेटवस्तू इत्यादींचा समावेश असतो.

अशा मोठ्या उपक्रमांमधील वाढत्या सहभागामुळे अधिक कचरा निर्माण होतो.जागरूकतेअभावी विविध प्रकारचा कचरा हा वर्गीकरण न करता मिसळला गेला तर त्यावर प्रक्रिया करणे अशक्य होते. याशिवाय मॅरेथॉन या मोठ्या परिसरामध्ये विस्तारलेल्या असल्याने कचरा देखील विविध ठिकाणी आढळतो आणि कुठल्याही एका संस्थेला ते साफ करणे एक आव्हान असते.

या सर्व गोष्टी कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? हे शक्य आहे पण त्यासाठी आपण सर्व एकत्र येणे गरजेचे आहे.

मॅरेथॉननंतर निर्माण होणारा कचरा कमी करण्यासाठी एपीसीसीआयची भूमिका

पुण्यातील मॅरेथॉनसारख्या मोठ्या उपक्रमानंतर कचरा निर्मिती कमी करण्यामध्ये अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) महत्त्वाची भूमिका बजावत आहे.विविध मॅरेथॉनच्या आयोजकांबरोबर सहयोग करून या उपक्रमांनंतर कुठलाही कचरा मागे राहणार नाही यासाठी प्रयत्न केला जात असून हे उपक्रम स्वच्छ आणि शाश्वत व्हावेत यावर एपीसीसीआयचा भर आहे.गेल्या काही वर्षात एपीसीसीआय ने 80 हून अधिक मॅरेथॉन्सशी सहयोग केला असून कचरा कमी करण्याच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलण्यास मदत केली आहे. या प्रक्रियेची सुरूवात मॅरेथॉनच्या मार्गावर ओला आणि सुका कचऱ्यासाठी वेगवेगळ्या बीन्स ठेवण्यापासून सुरूवात होते.सुका कचरा हा एपीसीसीआय तर्फे गोळा केला जातो आणि असा वर्गिकृत कचरा त्याच्या प्रकाराप्रमाणे प्रक्रिया केंद्रामध्ये पुनर्वापरासाठी पाठवला जातो. उपक्रमांच्या आयोजकांनी शाश्वततेच्या दृष्टीने विचार करण्यास या पुढाकाराच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते.

कचरा कमी करण्यासाठी काही साधे उपाय :

1) स्वत:ची पाण्याची बाटली आणा :- प्रत्येक सहभागी व्यक्ती हा स्पर्धा किंवा विक्रम मोडण्यासाठी भाग घेत नसतो.अनेक व्यक्ती हे तंदुरूस्तीसाठी धावतात.त्यामुळे स्वत:ची पाण्याची बाटली आणली तर प्लास्टिकच्या बाटल्यांचे प्रमाण कमी होऊ शकेल.त्याचबरोबर मॅरेथॉन दरम्यान ठिकठिकाणी हायड्रेशन स्टेशन्स स्थापित केले तर रिकामी झालेली बाटली परत भरून घेता येऊ शकते.

2) पेपर कपचा वापर :- ज्यांनी स्वत:च्या पाण्याच्या बाटल्या आणल्या नाहीत,त्यानां प्लास्टिक बॉटल्सच्या ऐवजी हायड्रेशन पॉईंटसना पेपर कप्समध्ये पाणी देता येईल.यामुळे प्लास्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होईल.कप वापरल्यानंतर तो गोळा करून रिसायकलिंगसाठी पाठवता येऊ शकतो.

3) डिजिटल सर्टिफिकेटस : प्रत्येक सहभागी व्यक्तीसाठी छापील प्रमाणपत्राऐवजी डिजिटल प्रमाणपत्र दिले जाऊ शकते.

4) कचरा वर्गीकरण व जागरूकता :- मॅरेथॉन दरम्यान व नंतर कचरा वर्गीकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.ओला व सुका कचरा लोकांना टाकता येईल अशी ठिकाणे निर्माण करून तेथे ठेवलेल्या बीन्समध्ये कचरा टाकण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.

5) रिड्युस,रियुज व रिसायकल :- बॅनर्स व चिन्हांकांसाठी पुन्हा वापरता येईल असे साहित्य समाविष्ट करणे गरजेचे आहेज.जुन्या उपक्रमांना वापरले गेलेले साहित्य वर्तमान व भविष्यातील मॅरेथॉनसाठी नूतनीकृत करून वापरले जाऊ शकते.

हा सर्व बदल एका दिवसात होणार नाही,यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावे लागेल.आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद हा प्रोत्साहन देणारा आहे.आयोजक आणि सहभागींना कचरा व्यवस्थापन व हवामान बदल याचे गांभीर्य माहित असून सर्वजण प्रयत्न करत आहेत ही एक सकारात्मक बाब आहे.

तुम्ही जर आयोजक असाल तर leadv@adarpcleancity.com किं
वा ceo@adarpcleancity.comया ई-मेल वर संपर्क साधा.

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे