प्रतिबंध आणि तत्परतेला चालना देणारी कार्यशाळा

कामाच्या प्रत्येक ठिकाणी किंवा कामाच्या वातावरणात काही ना काही प्रकारची जोखीम असतेच,मात्र त्यात सर्वांत सामान्य जोखीम म्हणजे आगीच्या घटना. त्यामुळेच अशा घटनांना सामोरे जाण्याचे कौशल्य शिकणे आणि कोणत्याही मनुष्याला किंवा मालमत्तेला इजा होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने आवश्यक कौशल्यांसह सर्व टीम सदस्यांना सुसज्ज करण्याच्या उद्देशाने आपल्या स्वच्छता दूतांसाठी दोन अग्निसुरक्षा कार्यशाळांचे आयोजन केले होते. यामध्ये पहिली कार्यशाळा ही हडपसर येथील अदर इस्टेट पार्किंग आणि दुसरी कार्यशाळा येरवडा येथे पार पडली. आगीपासून बचाव,आपात्कालीन स्थितीत प्रतिसाद आणि वैयक्तिक सुरक्षा उपायांबद्दल स्वच्छतादूतांना प्रशिक्षित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे,जेणे करून,आगीशी संबंधित संभाव्य घटनांपासून ते स्वत:चे आणि समुदायाचे संरक्षण करू शकतील.

हडपसर मधील काळे बोराटे नगर येथील स्टेशन ड्युटी ऑफिसर अनिल गायकवाड आणि येरवडा येथील संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली,टीमने विविध प्रकारच्या आगीच्या घटनांचा सामना करणे,अग्निशामक उपकरणे हाताळणे,उघड्या गटारांमध्ये पडण्याच्या घटना आणि पावसाळ्यात झाडे पडणे यासारख्या घटना हाताळण्याचे व मदत करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रत्यक्ष ठिकाणी काम करणाऱ्या स्वच्छतादूतांना अशा प्रकारच्या घटनांचा अनुभव येत असतो आणि म्हणूनच अशा याचा सामना करण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण आहे.

या कार्यशाळेत पुण्यातील पूर्व भागातील एपीसीसीआयचे सुमारे 375 स्वच्छता दूत सहभागी झाले होते.एपीसीसीआय आणि पुणे महानगरपालिकेच्या अग्नीसुरक्षा विभागाकडून प्रतिबंध आणि तत्परतेला चालना देण्याचा हा सामूहिक प्रयत्न होता.

या कार्यशाळेच्या आयोजनासाठी एपीसीसीआय तर्फे श्री अश्विन मोहिते, श्री.फारुख बांगी ,श्री. निलेश रामेकर आणि श्री.पवन बडगुजर यांनी विशेष परिश्रम घेतले.


Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे