इंटरनॅशनल व्हॉलेंटिअर डे - स्वयंसेवकांच्या अभूतपूर्व कार्याला सलाम करणारा दिवस
दुर्गम भागात शिक्षण,आरोग्यसेवा,पर्यावरण,कौ
मानवता,व्यक्तिमत्त्व विकास आणि समुदायावर सकारात्मक प्रभाव
स्वयंसेवा
ही केवळ सेवा नसून त्याचे अनेक पैलू असतात.स्वयंसेवेमुळे कोणत्याही
व्यक्तीमधील मानवी घटक अधोरेखित होतो.तसेच एक समान ध्येयासाठी सांघिक
प्रयत्न होतो. ना नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्था आणि समाजासाठी काम करणाऱ्या समुदायांसाठी स्वयंसेवक एक जीवनदायी घटकासारखे असतात.
समाजासाठी
आपले काही उत्तरदायित्व असते आणि त्याची परतफेड करणे स्वयंसेवेमुळे शक्य
होते.पण स्वयंसेवेचा हा एकच पैलू नसून यामुळे आपल्या वैयक्तिक विकासात
देखील भर पडू शकते.सांघिक कार्यामुळे नेटवर्किंगमध्ये मदत होते,आपल्या
आवडीच्या क्षेत्रात स्वयंसेवक म्हणून काम केल्याने आपल्या दैनंदिन
कामकाजाचा ताण कमी करण्यास मदत होते,आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते
आणि एक समाधानी भावना निर्माण होते. स्वयंसेवेमुळे
आपल्याला नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळते आणि आपल्यातील सुप्त
सामर्थ्य कळण्यास मदत होते.प्रत्येक गोष्ट ही समाजाप्रती आदरभाव आणि
कल्याणाचे उद्दिष्ट ठेऊन केल्याने एक वेगळा आनंद मिळतो.स्वयंसेवा ही विशेष
यासाठी आहे,कारण या कार्यात सर्वांचे उद्दिष्ट हे एकच असते आणि ते म्हणजे
आपले विश्व आपण आणखी चांगले कसे बनवू शकतो ?
स्वयंसेवा ही अदर
पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या जागरूकता उपक्रमांमध्ये
केंद्रस्थानी आहे.वर्षभर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून
व्यावसायिकांपर्यंत विविध पार्श्वभूमीचे अनेक स्वयंसेवक शहरातील विविध
ठिकाणी स्वच्छता मोहिमेसाठी एकत्र येतात.शाश्वततेसाठी झटणारा आणि समाजावर
सकारात्मक प्रभाव टाकून स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा समुदाय निर्माण करणे
हे मुख्य उद्दिष्ट आहे.तुम्ही अनुभवी स्वयंसेवक असाल किंवा पहिल्यांदा
स्वयंसेवेसाठी सहभाग घेणार असाल तर leadv@adarpcleancity.com किंवा