माझी वारी स्वच्छ वारी मोहिमेला चांगला प्रतिसाद
१२०० हून अधिक
स्वयंसेवक,अनेक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या सांघिक कार्यामुळे
२० जून ते २४ जून २०२५ या चार दिवसांच्या कालावधीत १३० टन
सुका कचरा गोळा करण्यात आला. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह
(एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या माझी वारी स्वच्छ वारी या
उपक्रमाअंतर्गत पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर सुमारे १४०
किमी रस्ता पालखी प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आला.
यासाठी
अदर पुनावाला क्लीन सिटी बरोबरच लोणी काळभोर, कुंजीरवाडी,
सोरतापवाडी,उरुळी कांचन, वडकी, सासवड, झेंडेवाडी, दिवे काळेवाडी, यवत येथील
ग्रामपंचायत आणि पुणे महानगरपालिका
यांच्यासह गावांमधील स्वयंसेवक यांच्या सांघिक कार्यातून पालखी
मिरवणुकीच्या मार्गांवर काही तासांतच रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही
स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविली जाते.
यावर्षी स्वयंसेवकांना सहजरित्या कचरा गोळा करून ठेवता यावा यासाठी एपीसीसीआय तर्फे पालखी मार्गावर ६५ ग्रीन नेटस बसविण्यात आले. तसेच १३६ हून अधिक कचरा वेचक वाहने आणि मशिन सेवेत कार्यरत होत्या. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, कामकाज व्यवस्थापक निलेश रामेकर यांनी सर्व ग्रामपंचायत आणि स्वयंसेवकांमध्ये प्रत्यक्ष भेटी आणि व्हॉट्सॲपच्या मार्फत समन्वय साधण्याचे काम केले. स्वतंत्रपणे गोळा करण्यात आलेल्या सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पेपर कप इत्यादींचा समावेश होता. स्वयंसेवकांना प्लॉगिंग बॅगसह साफसफाईसाठी साहित्य देण्यात आले.
विविध सामाजिक व इतर संस्था हे या मेहिमेमध्ये दरवर्षी मोलाचे योगदान देत आहेत.यामध्ये बार्कलेज बँक,पीएमसी, मोझे स्कुल,ईस्मालिज इंडिया,सायस फाउंडेशन, केसीबी,पीसीबी,एएसआर सर्व्हिसेस,कर्मयोगिनी महिला ग्रुप हडपसर,राजे क्लब शेवाळेवाडी महिला मंडळ, शंभू राजे सांस्कृतिक मंडळ कर्मयोगिनी ग्रुप, जयहिंद ग्रुप्स, विश्व हिंदू परिषद, पर्यावरण संरक्षण समिती,सुदर्शन युवा फाउंडेशन ,ग्रामीण विकास विद्यालय, ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन, कऱ्हामाई फाऊंडेशन, संत सोपानकाका सहकारी बँक, उरळी कांचन सहजापूर, सासवड नगरपरिषद आणि वाघिरे कॉलेज यांचा समावेश आहे.
मागील पंधरा दिवसांपासून स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यासाठी या सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करून संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती तसेच सुमारे १२०० हून अधिक स्थानिक स्वयंसेवकांसह एपीसीसीआयच्या ३५० स्वयंसेवकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला होता. अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह मार्फत सर्व स्वयंसेवकांना कचरा संकलनासाठी पिशव्या, ग्लोव्हज् आणि वाहने पुरवण्यात आली.
हे अभियान अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.