घरगुती दैनंदिन कृती नद्यांच्या परिसंस्थांचे जतन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात

नदीशी संबंधित जवळजवळ सर्व प्रमुख समस्यांचे मूळ म्हणजे लोकांचा नदीशी संपर्काचा अभाव असल्याचे मत जीवित नदी - लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशनच्या संस्थापक संचालक डॉ.शैलजा देशपांडे यांनी व्यक्त केले.आपण सर्वजण एकत्र येऊन वैयक्तिक योगदान दिले तर नदीच्या परिसंस्थांचे रक्षण करणे शक्य आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्सच्या पाचव्या सत्रात त्यांनी एपीसीसीआयच्या कार्यालयात येऊन स्वच्छता सैनिक व तरूण स्वयंसेवकांशी संवाद साधला.शाश्वतता आणि नेतृत्वाबाबत विविध पैलू आणि आपले शहर अधिक राहण्यायोग्य कसे बनवता येईल याबाबत तज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी क्लीन सिटी टॉक्सचे आयोजन केले जाते.

याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर,मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे आणि लीड वॉलेंटियर सत्या नटराजन आदी मान्यवर उपस्थित होते.वर्तुळ या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या व फीट कव्हर 360 या मॅरेथॉन आयोजक संस्थेच्या तरुण स्वयंसेवकांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

जीवितनदी या उपक्रमाची सुरूवात 2014 मध्ये विविध व्यावसायिक क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनाची आवड असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन केली. याचे मुख्य उद्दिष्ट नद्यांविषयी लोकांचा दृष्टीकोन बदलणे आणि विशेष करून शहरी भागात लोकांचा नद्यांशी हरवलेला संबंध पुन्हा प्रस्थापित करणे हे आहे.ही संस्था विविध जागरूकता उपक्रमांद्वारे पुण्यातील नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी काम करण्याचा प्रयत्न करते.

शैलजा देशपांडे म्हणाल्या की,नद्यांमध्ये होणाऱ्या प्रदूषणासाठी आपण नेहमीच उद्योग व इतर भागधारकांना दोष देत असतो.मात्र आपण दैनंदिन जीवनात कुठल्या वस्तू वापरतो व त्याचे पुढे काय होते याबाबत जागरूक राहिले पाहिजे.यातूनच आपण स्वच्छतेच्या दृष्टीने योगदान देऊ शकू.आपण जीवनशैलीच्या भाग बनलेल्या दैनंदिन वस्तूंमधून हानिकारक पदार्थ काढू शकलो आणि योग्य वस्तू वापरू शकलो तर नद्यांच्या स्वच्छतेत आपण हातभार लावून मोलाचे योगदान देऊ शकतो. 

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना