पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना
आपल्या शहरातील सार्वजनिक जागांची स्वच्छता हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे हे एक चांगले काम आहे. आपल्या शहराला परिभाषित करणाऱ्या सार्वजनिक जागाप्रती आपली बांधिलकी आणि जबाबदारीची भावना यातून प्रतिबिंबित होते.अनेक लोकांना आपल्या शहरासाठी काही तरी करायचे असते. पण सुरुवात कशी करायची हे लक्षात येत नाही. म्हणूनच अशा उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे हा योग्य मार्ग आहे. कारण सांघिक कार्याने आपण अधिक व्यापक व चांगले काम करू शकतो त्यासाठी तुमच्या परिसरातील विश्वासार्ह अशी स्वयंसेवी संस्था हे योग्य दिशेने पहिले पाऊल आहे. अनेकदा तुम्ही अशा संघटनेबरोबर सहभागी होण्याचा निर्णय घेतला की पहिल्यांदा उपक्रमात भाग घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्या खालीलप्रमाणे... १. आपले नाव आणि इतर तपशिलांसह नोंदणी करावी. २. स्वयंसेवा करत असताना काही कारणामुळे गरज पडल्यास तुमचा आपातकालीन संपर्क आणि रक्तगट यांची देखील नोंदणी करून ठेवावी. ३. उपक्रमाच्या ठिकाणी वेळे आधी पोहोचा. उपक्रमाबाबत सुरुवातीलाच माहिती मिळेल. ४...