पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे
प्लास्टिक हे आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक भाग झाला असताना,पर्यावरणाला हानी होऊ नये हा दृष्टीने आपण सजग ग्राहक व वापरकर्ते होणे आवश्यक आहे,असे मत रिचरखाच्या संस्थपिका अमिता देशपांडे यांनी व्यक्त केले. अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे शाश्वततेचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या क्लीन सिटी टॉक्सच्या चौथ्या सत्रात त्या बोलत होत्या. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, लीड व्हॉलेंटिअर सत्या नटराजन यांसह एपीसीसीआयची ऑपरेशन्स टीम आणि स्वयंसेवक उपस्थित होते.स्वच्छता उपक्रमात सातत्याने सहभागी होऊन योगदान देणाऱ्या भूमी या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. व्यवसायाने आयटी अभियंता असलेल्या अमिता देशपांडे यांनी अमेरिकेतील आपले करिअर सोडून भारतात परतल्या. प्लास्टिक कचऱ्याचे धाग्यात रूपांतर करून पिशव्या,बॅग्स,बास्केटस,मॅटस, घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू अशी अनेक सुंदर उत्पादने तयार करण्याचे त्यांनी त्यांचे ध्येय साध्य केले.या उपक्रमाला लोकांकडून च...