पर्यावरणाबाबत शिक्षणाद्वारे शाश्वत भविष्य शक्य
संयुक्त राष्ट्रांनी (युएन) हवामान बदल,निसर्ग व जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण या आपल्या पृथ्वीवरील पर्यावरणाला भेडसावणाऱ्या तीन प्रमुख समस्या म्हणून नमूद केल्या आहेत. या परस्पर जोडलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अभूतपूर्व सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि याच प्रयत्नांच्या केंद्रस्थानी अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी मानले जाणारे सर्वांत महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण आहे. दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस जागतिक पर्यावरण शिक्षण दिन म्हणून ओळखला जातो.याद्वारे आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येते.हा दिवस निसर्ग आणि मानवतेला लाभदायक असलेल्या शाश्वत व पर्यावरणीयदृष्टया जागरूक भविष्याला चालना देण्याची सामायिक जबाबदारीची आठवण करून देतो. दीर्घकालीन पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी नैसर्गिक परिसंस्थांची सखोल समज,जैवविविधतेचे महत्त्व,आपल्या ग्रहासमोरील आव्हाने आणि आपण घेऊ शकतो अशी कृतीशील पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो ? बहुआयामी पर्यावरणीय संकटांचा सामना करण्यासाठी छोट्या पण प्रभावी...