पर्यावरणाबाबत शिक्षणाद्वारे शाश्वत भविष्य शक्य

संयुक्त राष्ट्रांनी (युएन) हवामान बदल,निसर्ग व जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण या आपल्या पृथ्वीवरील पर्यावरणाला भेडसावणाऱ्या तीन प्रमुख समस्या म्हणून नमूद केल्या आहेत. या परस्पर जोडलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अभूतपूर्व सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि याच प्रयत्नांच्या केंद्रस्थानी अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी मानले जाणारे सर्वांत महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण आहे.

दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस जागतिक पर्यावरण शिक्षण दिन म्हणून ओळखला जातो.याद्वारे आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येते.हा दिवस निसर्ग आणि मानवतेला लाभदायक असलेल्या शाश्वत व पर्यावरणीयदृष्टया जागरूक भविष्याला चालना देण्याची सामायिक जबाबदारीची आठवण करून देतो. दीर्घकालीन पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी नैसर्गिक परिसंस्थांची सखोल समज,जैवविविधतेचे महत्त्व,आपल्या ग्रहासमोरील आव्हाने आणि आपण घेऊ शकतो अशी कृतीशील पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

एक व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो ?

बहुआयामी पर्यावरणीय संकटांचा सामना करण्यासाठी छोट्या पण प्रभावी कृतींपासून सुरूवात होते.आपण बदल कसा घडवू शकतो,त्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे :

1) योग्य कचरा वर्गीकरण - आपल्या घरी निर्माण होणारा कचरा ओला व सुका असे वर्गीकृत करून जबाबदारपणे विल्हेवाट लावा.

2) 3आर - 3आर या संकल्पनेचे अंगीकरण करा. 3आर म्हणजे रिड्युस,रियुज व रिसायकल.शाश्वत उत्पादनांचा पर्याय निवडा आणि कचरा कमी करण्यासाठी शक्य असेल तेव्हा वस्तूंचा फेरवापर व पुर्नवापर करा.

3) सिंगल युज प्लास्टिक टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करा.

4) उत्पादने निवडताना जागरूक रहा - पर्यावरणासाठी कमी हानिकारक उत्पादने निवडा आणि कार्बन उत्सर्जन कमी करा.

5) लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा - पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण उचलत असलेल्या पावलांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून प्रेरित करा.

या कृती तुलनेने छोट्या वाटल्या तरी एकत्रितपणे यात सातत्य ठेवल्यास पर्यावरणासाठी लाभदायक ठरू शकते.

पर्यावरणाबाबत शिक्षण यामुळे जागरूकता निर्माण होण्याबरोबरच अनेक लोकं सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी प्रेरित होऊ शकतात.व्यक्ती आणि समुदायांना ज्ञान आणि शाश्वत पध्दतींनी सक्षम करून,आपण सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.या सर्व गोष्टींमुळे आपण एक शाश्वत भविष्याचा पाया रचू शकतो.

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे