प्रभावी उपक्रमांद्वारे घडत आहे परिवर्तन
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या दहाव्या सत्रात स्वच्छ, हरित भविष्यासाठी काम करत परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या. या सत्रात शाश्वत पर्यटन आणि स्वच्छता या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आणि स्वयंसेवकांनी हाती घेतलेल्या प्रभावी उपक्रमांची माहिती देण्यात आली. ग्रीन ट्रेल फाऊंडेशनचे संस्थापक योगेश करंदीकर व टीम सदस्य बृहस्पती राय यांनी नोव्हेंबरमध्ये दक्षिण कोकणातील निसर्गरम्य परिसरात होणाऱ्या 100/50 किमीचा रोमांचक वॉकथॉन कोकण ट्रेल 2025 बद्दल माहिती दिली. अशा प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या कचरा व्यवस्थापनाबाबतची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अधोरेखित केली. वर्क फॉर कम्पॅशनचे मोहम्मद आवेस आणि डॉ.आरिफ शेख, स्प्रेडिंग हॅपीनेस फाऊंडेशनच्या संस्थापिका अमरीन नवलूर व प्रतीक पाडळे आणि नईम मिराजकर उपस्थित होते. या संस्था विविध समुदाय स्वच्छता उपक्रम सक्रीयपणे राबवत आहेत. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे,लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन उपस्थित होते. क्लीन सिटी टॉ...