परिसंस्था जतन प्रकल्पांची योजना व अमंलबजावणी करण्यासाठी ठिकाणांची परिसंस्था समजून घेणे आवश्यक :- डॉ.एराक भरूचा

परिसंस्था जतन   (इकोरिस्टोरेशन) करण्यासाठी एका विशिष्ट जागी आधीपासून असलेली परिसंस्था समजून घेणे व नैसर्गिकता जपून जैवविविधतेची पुनर्निर्मिती करणे ही परिसंस्था  पुनर्स्थापनेची गुरूकिल्ली आहे,असे मत प्रख्यात पर्यावरण व जैवविविधता तज्ञ डॉ.एराक भरूचा यांनी व्यक्त केले.

अदर पुनावाला क्लिनिक सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे शाश्वततेचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी सुरू केलेला क्लीन सिटी टॉक्स च्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते.डॉ.भरूचा यांनी रोट्रॅक्ट क्लब ऑफ औंध स्मार्ट सिटीच्या युवा सदस्यांशी संवाद साधला.याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर,मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे आणि लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन उपस्थित होते.

याप्रसंगी औंध येथील नदीकाठावर करत असलेल्या स्वच्छतेसाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ औंध स्मार्ट सिटीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.भरूचा पुढे म्हणाले की,    परिसंस्था जतन    (इकोरिस्टोरे
शन) हे एक शास्त्र बनले आहे,ज्याला रिवाईल्डींग असे म्हणतात. मानवी हस्तक्षेपामुळे विविध परिसंस्थांमध्ये बदल झाले आहेत. एखाद्या विशिष्ट ठिकाणचा भूभाग,त्याचा इतिहास अशा सर्व गोष्टी जैविक,भौगोलिक आणि हवामानाच्या दृष्टीकोनातून समजून घेण्याची गरज आहे.विविध उदाहरणे देत सादरीकरण करताना डॉ.भरूचा यांनी परिसंस्था  पुनर्स्थापना  करण्यासाठी असलेली आवश्यक साधने आणि पध्दतींवर प्रकाश टाकला.ते म्हणाले की,निसर्गावर आधारित उपाय आणि तंत्रज्ञान याचा समतोल साधण्याची गरज आहे.

सत्या नटराजन यांनी एपीसीसीआयच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.एपीसीसीआयचे सहयोगी अमित जानोरीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे