कचरा व्यवस्थापन आणि मातीचे आरोग्य - शाश्वत विकासासाठी परस्परसंबंधित असलेले दोन महत्वाचे पैलू
जगाची लोकसंख्या जसजशी वाढत चालली आहे तसतसे कचऱ्याचे प्रमाण आणि संबंधित समस्या देखील वाढत चालल्या आहेत. कचरा व्यवस्थापन आणि मातीचे आरोग्य हे दोन महत्त्वाचे परस्परसंबंधित घटक आहेत जे शाश्वत विकासासाठी महत्त्वाचे आहेत. अयोग्य कचरा व्यवस्थापनाचा परिणाम हा मातीच्या आरोग्यावर तसेच एकूणच पर्यावरणावर दिसून येतो. अयोग्य कचरा व्यवस्थापन,रस्त्यावरील कचरा विलग न करणे, उघड्यावर कचरा टाकणे किंवा जाळण्यामुळे हवा, पाणी आणि माती प्रदूषित होते. कचऱ्यामध्ये टाकून दिलेल्या पदार्थांमधून हानिकारक रसायने आणि विषारी द्रव्ये जमिनीत येऊन भूजल संसाधने दूषित करतात आणि मातीतील सूक्ष्मजीव आणि पोषक घटकांवर नकारात्मक परिणाम करतात. मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म हे वनस्पतींची वाढ, पाणी गाळण्याची प्रक्रिया, कार्बन शोषून घेणे आणि पोषणाचे चक्र यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. माती ही विशेषत: निरोगी जमिनीची धूप आणि पुराचा धोका कमी करण्यास मदत करते. तसेच कार्बन शोषून घेण्याचे कार्य करून हवामान बदल कमी करण्यास हातभार लावते. मातीचे आरोग्य सुधारणे शक्य आहे, परंतु अयोग्य क...