मार्ग अनेक,ध्येय एक - शाश्वतता

पर्यावरण,शाश्वततेबाबत जागरूकता निर्माण करणारे प्रा.जयंत महाजन,प्रदीप कुमार आणि प्रिया कुमारी यांनी नुकतीच अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हच्या (एपीसीसीआय) कार्यालयाला भेट दिली. एपीसीसीआय तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्सच्या सातव्या सत्रात त्यांनी आपला आजवरचा प्रवास आणि पुढील ध्येयाबद्दल सांगितले.

क्लीन सिटी टॉक्स या सत्रात नेतृत्व आणि शाश्वततेचे विविध पैलू तज्ञ व तरूणांकडून जाणून घेण्याचे उद्दिष्ट आहे.याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे व लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन उपस्थित होते.

व्यवस्थापन विषयात प्राध्यापक असलेले जयंत महाजन यांनी आपल्या कामातून तात्पुरती विश्रांती घेऊन भारतातील सीमेलगतच्या व दुर्गम भागात सायकलिंग एक्सपिडिशन हाती घेऊन पर्यावरण शाश्वततेबाबत जागरूकता निर्माण करत आहेत.तर दुसरीकडे प्रदीपकुमार आणि प्रिया कुमारी उंच शिखर सर करत प्लास्टिक कचरा व मेंस्ट्रुअल हायजीन याबाबत जागरूकता निर्माण करत आहे. हे तिघेही चेंज बिफोर क्लायमेट चेंज हा दूरदर्शी सामाजिक उद्योजक असलेल्या रूपेश राय यांनी स्थापन केलेल्या प्लॅटफॉर्मचा भाग आहे.रूपेश राय यांनी गेल्या वर्षी आपल्या सायकल एक्सपिडिशन दरम्यान एपीसीसीआयच्या कार्यालयाला भेट देऊन सदस्यांशी संवाद साधला होता.

या तिघांचाही प्रवास दृढ निश्चय आणि एका गोष्टीवर लक्ष्य केंद्रित करण्याची ताकद अधोरेखित करते.गंभीर वैद्यकीय स्थितीवर मात करून पुन्हा आपल्या कामकाजात रूजू होणाऱ्या प्रदीप कुमार यांच्या मते आजार हा शरीरापेक्षा मनात जास्त असतो. आपली मानसिकता बदलत त्यांनी तीन वर्षात अनेक सायकलिंग एक्सपिडिशन हाती घेतल्या.दुसरीकडे प्रिया कुमारी हिला आता हिमालय आणि उंच शिखरे सर करण्याचे ध्येय आहे.त्या माध्यमातून आपला जागरूकता उपक्रम त्या पुढे नेतील.प्रा.महाजन यांच्या मते जागरूकता मोहिम हे केवळ एकतर्फी नसून भारताच्या समृध्द विविधतेचे सामर्थ्य दर्शविणारा आणि त्यातून आणखी प्रेरणा देणारा अभूतपूर्व प्रवास आहे.

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

प्रतिबंध आणि तत्परतेला चालना देणारी कार्यशाळा

Our everyday actions at home can can play a crucial role in preserving river ecosystems