Posts

Showing posts from December, 2025

शहरांमध्ये मातीचे संवर्धन करण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून काय करू शकतो?

माती म्हटलं की, झाडे, अन्न, मातीवर अवलंबून असलेली असंख्य जीवजंतूंचे अधिवास अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. माती म्हटले की पाणी आणि पृथ्वी आठवते! निरोगी माती ही जीवनाची पायाभूत गरज असून ती अन्न उत्पादन, जैवविविधता तसेच पाणी व हवामान व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. माती वनस्पतींच्या वाढीस आधार देते, पर्यावरणातील संतुलन राखते आणि पृथ्वीच्या आवश्यक पोषकद्रव्य व कार्बन चक्राला स्थिर ठेवते. साधारणपणे माती म्हटलं की आपल्याला शहरांपासून दूर असलेली विशाल शेत जमीन आठवते, पण शहरी भागातील मातीबद्दल आपण क्वचितच विचार करतो आणि यावर्षीच्या वर्ल्ड सॉईल डे चा विषय हा या शहरी भागातील मातीच्या आरोग्यावर आधारित आहे.दरवर्षी 5 डिसेंबरला साजरा होणाऱ्या ‌‘जागतिक मृदा दिन‌’ (वर्ल्ड सॉईल डे) 2025 ची संकल्पना ही हेल्दी सॉईल्स फॉर हेल्दी सिटीज (निरोगी शहरे निरोगी मातीमुळे) ही असून शहरातील पर्यावरण व माती यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.   हवामान बदल आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपांमुळे आपल्या मातीवर गंभीर परिणाम होत आहेत. याचा परिणाम फक्त मातीच्या आरोग्यावरच नाही तर संपूर्ण ...