2025 : पुण्याच्या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या युवा परिवर्तनकर्त्यांचे वर्ष

यंदाच्या वर्षातील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे आपल्या शहरासाठी पुढाकार घेऊन जबाबदारी स्विकारणाऱ्या युवा स्वयंसेवकांचा वाढता सहभाग. अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे आपल्या दैनंदिन कामकाजापलीकडे जाऊन पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला जातो.

 
या उपक्रमांमध्ये सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता,नदी तटांची साफसफाई,वारसा स्थळांच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता,मॅरेथॉन नंतरची स्वच्छता मोहिम तसेच सण-उत्सवांनंतर स्वच्छता करणे यांचा समावेश आहे. अर्थपूर्ण सहभाग आणि वाढती जनजागृती यांमुळे 2025 हे वर्ष विशेष ठरले आहे.

जनजागृतीतील दिसून येणारा महत्त्वपूर्ण बदल

यावर्षी स्वच्छता मोहिमांची संख्या तसेच त्यामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. ही वाढ नागरिकांच्या मानसिकतेत झालेल्या सकारात्मक बदलाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. लोकांना आता सार्वजनिक ठिकाणांच्या वापराबरोबरच त्या जागांची स्वच्छता व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायचे आहे.

जागरूकतेच्या अभावामुळे मोठ्या कार्यक्रमांनंतर कचऱ्याचे ढीग मागे राहण्याचे दिवस आता गेले आहेत.आजकालच्या कार्यक्रमांचे तरूण आयोजक हे कार्यक्रमांपूर्वी,कार्यक्रमादरम्यान व कार्यक्रमानंतर जबाबदार कचरा व्यवस्थापन निश्चित करण्यासाठी स्वच्छता भागीदार म्हणून एपीसीसीआयसोबत सहयोग करण्याकरिता संपर्क साधत आहेत.

युवा नेतृत्वाचा पुढाकार
 
या वर्षातील सर्वात उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे स्वच्छता मोहिमांचे नेतृत्व करणाऱ्या युवा नेतृत्वाच्या संख्येतील वाढ. या युवा नेतृत्वाची अनोखी बाब म्हणजे केवळ कृतीतून नव्हे तर प्रत्येक प्रक्रिया,कार्य समजून घेण्यास उत्सुकता बाळगणारा त्यांचा दृष्टीकोन.
 
शाश्वत विकासाची संकल्पना तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. महाविद्यालयांमधील हॅकॅथॉन,चर्चासत्रे आणि नाविन्यपूर्ण स्पर्धा आता कचरा व्यवस्थापन व पर्यावरणीय शाश्वततेशी संबंधित प्रत्यक्ष जगातील समस्यांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहेत. आपले प्रयत्न प्रत्यक्षात कसे परिणामकारक ठरतात हे या युवा परिवर्तनकर्त्याना जाणून घ्यायचे आहे.
 
पुढील वाटचाल - स्वच्छ शहरांचे भविष्य
 
वर्ष 2026 मध्ये प्रवेश करताना विशेषत: सोशल मिडियावरच कचरा व्यवस्थापन व स्वच्छता यावर अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण चर्चांची अपेक्षा करू शकतो. आम्हाला अपेक्षा आहे की,जास्तीत जास्त तरूण स्वयंसेवक पुढे येऊन स्वच्छतेचा उद्देश आणि जागरूकता निर्माण करतील.

पुणे शहर कचरामुक्त आणि शाश्वत विकासासाठी एक आदर्श शहर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून देशभरातील शहरांसाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे.स्वच्छता मोहिमा राबविण्यापासून ते त्यामुळे झालेला दीर्घकालीन परिणाम हा बदल महत्त्वपूर्ण क्रांती घडवणारा आहे.

स्वच्छता उपक्रम व मोहिमांचे भविष्य हे माहितीपूर्ण कृतीद्वारे अनुभवायला मिळते.तरूण नेतृत्वाखाली 2026 आणि त्यानंतरचा काळ हा नक्कीच आशादायक असेल.

एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे व लीड वॉलेंटियर सत्या नटराजन 

Popular posts from this blog

Environmental Health: Safeguarding Our Future, Sustaining Our Planet

जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..