शहरांमध्ये मातीचे संवर्धन करण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून काय करू शकतो?
माती म्हटलं की, झाडे, अन्न, मातीवर अवलंबून असलेली असंख्य जीवजंतूंचे
अधिवास अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. माती म्हटले की पाणी
आणि पृथ्वी आठवते! निरोगी माती ही जीवनाची पायाभूत गरज असून ती अन्न
उत्पादन, जैवविविधता तसेच पाणी व हवामान व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची
आहे. माती वनस्पतींच्या वाढीस आधार देते, पर्यावरणातील संतुलन राखते आणि
पृथ्वीच्या आवश्यक पोषकद्रव्य व कार्बन चक्राला स्थिर ठेवते.
साधारणपणे माती म्हटलं की आपल्याला शहरांपासून दूर असलेली विशाल शेत जमीन आठवते, पण शहरी भागातील मातीबद्दल आपण क्वचितच विचार करतो आणि यावर्षीच्या वर्ल्ड सॉईल डे चा विषय हा या शहरी भागातील मातीच्या आरोग्यावर आधारित आहे.दरवर्षी 5 डिसेंबरला साजरा होणाऱ्या ‘जागतिक मृदा दिन’ (वर्ल्ड सॉईल डे) 2025 ची संकल्पना ही हेल्दी सॉईल्स फॉर हेल्दी सिटीज (निरोगी शहरे निरोगी मातीमुळे) ही असून शहरातील पर्यावरण व माती यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
हवामान बदल आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपांमुळे आपल्या मातीवर गंभीर परिणाम होत आहेत. याचा परिणाम फक्त मातीच्या आरोग्यावरच नाही तर संपूर्ण परिसंस्थेवर होतो,ज्यामध्ये पोषक घटक, पाण्याची झिरपण्याची क्षमता, विविध जीवांचेे अधिवास इत्यादी सर्व घटकांचा समावेश आहे.
माती पावसाचे पाणी शोषून घेण्यासाठी, तापमान नियंत्रित करण्यासाठी, कार्बन साठवण्यासाठी आणि हवेची गुणवत्त्ता सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. मात्र जगभरात वाढत्या काँक्रीटकरणामुळे पूरस्थिती, तापमानवाढ आणि प्रदूषणाचा धोका वाढत चालला आहे. तरी देखील शहरांमध्ये उद्याने, नदीकाठ, डोंगरउतार आणि सार्वजनिक ठिकाणे अशा मोकळ्या जागा आजही टिकून आहेत,जिथे मातीचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन शक्य आहे.
आपण व्यक्ती म्हणून कसे योगदान देऊ शकतो?
प्रत्येकजण रोजच्या सवयींमध्ये छोटे बदल करून आपल्या शहरातील मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतो. घरात करता येणारी सर्वात सोपी आणि परिणामकारक गोष्ट म्हणजे कचऱ्याचे सुका,ओला आणि स्वयंपाक घरातील कचरा असे योग्य प्रकारे वर्गीकरण करणे. यामुळे हानिकारक कचरा मोकळ्या जागांमध्ये जाण्यापासून रोखला जातो आणि सेंद्रिय कचऱ्यापासून खत निर्मिती सुलभ होते.
स्वतंत्रपणे वर्गीकरण केलेल्या सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारे खत शहरातील मातीतील आवश्यक पोषक द्रव्य वाढवते, पाण्याची धारणक्षमता सुधारते आणि रसायनांच्या वापराची गरज कमी करते.
जागरूकतेने वापर, जबाबदार कचरा व्यवस्थापन आणि घरगुती किंवा समुदाय स्तरावरील खतनिर्मिती व बागकाम उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग या सर्व माध्यमांतून प्रत्येक व्यक्ती शहरातील मातीत लक्षणीय सुधारणा घडवू शकतो आणि पर्यावरण अधिक स्वच्छ व लवचिक बनवू शकतो.