अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हची दशकपूर्ती
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) दशकपूर्ती ने जानेवारी 2026 मध्ये 10 वर्षे पूर्ण केली असून तंत्रज्ञान चलित उपाय,नागरी सहयोग आणि लोक सहभागातून शाश्वत शहरी परिवर्तनामध्ये एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.स्वच्छ भारत मिशन ने प्रेरित होऊन उद्योगपती व लोकहितकर्ता श्री.अदर पुनावाला यांनी 2015 साली या उपक्रमाची घोषणा केली.पुणे शहरात सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सुधारणा व्हावी आणि स्वच्छ शहराच्या दृष्टीने नागरिकांमध्ये अभिमानाची भावना वाढावी यासाठी एक केंद्रित,ध्येय आधारित प्रयत्न म्हणून वैयक्तिक निधी देऊन एपीसीसीआयची त्यांनी सुरूवात केली.या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन जानेवारी 2016 मध्ये करण्यात आले. एक धाडसी दृष्टीकोनातून सुरू झालेला हा उपक्रम आता तंत्रज्ञान आधारित सार्वजनिक-खासगी भागीदारीत विकसित झाला आहे.एखादे शहर स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्यासाठी अभिनवता, सहयोग व लोकसहभागातून कसे साध्य करता येईल याची पुर्नव्याख्या या उपक्रमाने केली आहे. या उपक्रमाच्या केंद्रस्थानी नागरी सहकार्य,तंत्रज्ञान आधारित उपाय आणि नागरिकांचा सहभाग आहे.महानगरपालिका,स्वच्छता कर्मचारी आणि शहरी नियोजकांशी जवळू...