अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हची दशकपूर्ती
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) दशकपूर्ती ने जानेवारी 2026 मध्ये 10 वर्षे पूर्ण केली असून तंत्रज्ञान चलित उपाय,नागरी सहयोग आणि लोक सहभागातून शाश्वत शहरी परिवर्तनामध्ये एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.स्वच्छ भारत मिशन ने प्रेरित होऊन उद्योगपती व लोकहितकर्ता श्री.अदर पुनावाला यांनी 2015 साली या उपक्रमाची घोषणा केली.पुणे शहरात सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सुधारणा व्हावी आणि स्वच्छ शहराच्या दृष्टीने नागरिकांमध्ये अभिमानाची भावना वाढावी यासाठी एक केंद्रित,ध्येय आधारित प्रयत्न म्हणून वैयक्तिक निधी देऊन एपीसीसीआयची त्यांनी सुरूवात केली.या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन जानेवारी 2016 मध्ये करण्यात आले.
एक धाडसी दृष्टीकोनातून सुरू झालेला हा उपक्रम आता तंत्रज्ञान आधारित सार्वजनिक-खासगी भागीदारीत विकसित झाला आहे.एखादे शहर स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्यासाठी अभिनवता, सहयोग व लोकसहभागातून कसे साध्य करता येईल याची पुर्नव्याख्या या उपक्रमाने केली आहे.
या उपक्रमाच्या केंद्रस्थानी नागरी सहकार्य,तंत्रज्ञान आधारित उपाय आणि नागरिकांचा सहभाग आहे.महानगरपालिका,स्वच्छता कर्मचारी आणि शहरी नियोजकांशी जवळून काम करून या उपक्रमाने शहरातील प्रणालींना बदलण्याऐवजी त्यांना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे या सहयोगी उपक्रमांमुळे अधिक चांगला परिणाम साधण्यास मदत झाली आहे.
तंत्रज्ञान चलित उपायांनी मोठे परिवर्तन आणले आहे.डाटा आधारित कचरा व्यवस्थापन प्रणाली आणि जीपीएस सक्षम संकलन वाहनांपासून ते रिअल टाईम मॉनिटरिंग डॅशबोर्डस् पर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने शहरी स्वच्छता प्रयत्नांमध्ये पारदर्शकता कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व आणले आहे.
नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.जनजागृती मोहिम,डिजिटल प्लॅटफॉर्म व शाळांमधील उपक्रमाद्वारे नागरिकांना सक्रिय भागीदार बनविण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले गेले आहे.स्वच्छता मोहिमा व मॅरेथॉन नंतरची स्वच्छता यासारख्या विविध उपक्रमांना पाठिंबा देऊन आणि वर्तणूकीतील बदलांना प्रोत्साहन देऊन स्वच्छता ही लादलेली गोष्ट न राहता आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,हे बिंबवण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात आला आहे.
उद्देशप्रेरित नेतृत्व,आधुनिक व स्मार्ट तंत्रज्ञान आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नागरी सहभाग आपल्या भविष्यासाठी स्वच्छ शहरे निर्माण करण्यासाठी कसे एकत्र येऊ शकतात याचे एक शक्तीशाली उदाहरण म्हणून या उपक्रमाला ओळख मिळाली आहे.