रक्तदान - जीवन वाचवणारे निःस्वार्थ कृत्य

रक्तदान हे जागतिक स्तरावर आरोग्यसेवेसाठी एक मजबूत आधारस्तंभ आहे. रक्तदानाचे हे महान कृत्य लोकांचे जीव वाचविण्याबरोबरच हजारो कुटुंबियांना त्यांच्या प्रियजनांना बरे होऊन दैनंदिन आयुष्य जगताना पाहून आनंद मिळतो.


रक्तदानाच्या या महान कार्यात योगदान देण्याच्या प्रयत्नात अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने नुकतेच स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.


सुमारे शंभर टीम सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांसह सहभाग घेतला आणि रक्तदान केले. पुणे सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.


एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे आणि लीड व्हॉलेंटिअर सत्या नटराजन यांचा देखील रक्तदान केलेल्या टीम सदस्यांमध्ये सहभाग होता.

सर्व टीम सदस्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.आपल्या सहभागामुळे गरजूंचे प्राण वाचू शकतील, असे उपक्रम दरवर्षी घेण्यात यावेत, असे या सर्वांचे मत आहे.



Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना

Collaborative Endeavours Have The Potential To Render Our Marathons Both Clean And Ecologically Sustainable