एपीसीसीआयचा पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटमध्ये सहभाग

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर (एमसीसीआयए) तर्फे पुण्यामध्ये नुकतेच पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते.या दोन दिवसीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील उद्योग नेतृत्व आणि धोरणकर्ते सहभागी झाले होते.या परिषदेनिमित्त आयोजित प्रदर्शनात अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने एका विशेष पॅव्हेलियनद्वारे आपल्या सेवांचे सादरीकरण करत सहभाग घेतला. यानिमित्त कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता याबाबत एपीसीसीआयच्या प्रतिनिधींनी भेट देणाऱ्या लोकांशी संवाद साधला.

भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असताना वस्तूंचा वापर देखील लक्षणीयरित्या वाढत आहे आणि म्हणूनच प्रभावी कचरा व्यवस्थापनाला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे. हे आव्हान लक्षात घेत एपीसीसीआय तर्फे जनसामान्य आणि उद्योग नेतृत्वामध्ये विविध उपक्रमांद्वारे सातत्याने जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटमधील सहभाग हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

या परिषदेच्या माध्यमातून विविध उद्योग तज्ञांशी शाश्वतता या विषयावर संवाद साधता आला. एपीसीसीआय पॅव्हेलियनला भेट देणाऱ्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे उपाध्यक्ष अरविंद गोयल,एमसीसीआयएचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर, एमसीसीआयएच्या आयटी समितीचे माजी अध्यक्ष अमित परांजपे, एमसीसीआयए इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता.त्यांनी एपीसीसीआयचे स्वच्छतादूत,विविध मशिन्स आणि त्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये मिळणारे योगदान याचे कौतुक केले.

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे