रस्ता सुरक्षेसाठी जागरूकता आणि प्रशिक्षण हीच गुरूकिल्ली

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या स्वच्छतादूतांसाठी पुणे वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने जागरूकता सत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.येरवडा पोलिस स्टेशन सभागृह आणि अण्णासाहेब मगर कॉलेज,हडपसर येथे आयोजित या दोन कार्यशाळांमध्ये सुमारे 375 स्वच्छतादूतांनी भाग घेतला. एपीसीसीआयने आयोजित केलेल्या कार्यशाळेत येरवडा,कल्याणीनगर,मांजरी आणि कोरेगाव पार्क येथील वाहन चालक आणि मशीन ऑपरेटर्स ने सहभाग घेतला.पीएसआय श्री.एम.चंद्रकांत राघवन,श्री.शेख,श्री.पाटील,क्राईम ब्रँच इनस्पेक्टर पल्लवी मेहेर यांसह वाहतूक अधिकारी आणि तज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यामध्ये वाहतूक शिस्त,कायदेशीर मुद्दे,सुरक्षित वाहन चालविण्याच्या पध्दती,पार्किंग करताना घ्यावयाची काळजी,चालकाच्या जबाबदाऱ्या आणि अपघातामध्ये मदत कशी करावी किंवा मदत कशी मिळवावी यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.अण्णासाहेब मगर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मुळे हे देखील कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेत उपस्थित होते.



एपीसीसीयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे यांसह सुपरवायझर निलेश रामेकर,पवन बडगुजर,संदीप वाघमारे आणि फारूख बंगी उपस्थित होते.या सत्रांना मिळालेला प्रतिसाद पाहून एपीसीसीआयच्या इतर भागातील स्वच्छता दूतांसाठी देखील अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

रस्ता सुरक्षेसाठी व गर्दी कमी करण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आणि कुशलतेने वाहन चालविणे महत्त्वाचे आहे.म्हणूनच अशा कार्यशाळेतून सुरक्षितपणे वाहन चालविण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे.या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला व फलदायी ठरली,भविष्यात असे आणखी काही उपक्रम राबवावेत असे मत सहभागींनी व्यक्त केले.

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना