जागतिक आरोग्य दिवस - निरोगी भविष्यासाठी कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे
स्वयंपाक घरात निर्माण होणारा कचरा आणि प्लास्टिक पॅकेजिंगपासून ते जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व वापरात नसलेले कपडे,कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.या आव्हानात आणखी भर म्हणजे उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा आणि कचरा जाळण्याच्या घटना.यामुळे प्रदूषण वाढतेच शिवाय मानवी आरोग्य आणि पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होतो.ही माहिती नवीन नसली तरी या परिस्थितीचे गांभीर्य वाढत चालले आहे. धोके माहित असूनही आपल्यापैकी बरेच जण घरातील कचरा बाहेर गेल्यावर आपली जबाबदारी संपते असे गृहीत धरतात,मात्र आपली जबाबदारी यापेक्षाही खूप अधिक आहे.संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम) जागतिक शहरी घनकचरा (ग्लोबल म्युनिसिपल सॉलिड वेस्ट) चे प्रमाण 2023 मध्ये 2.1 अब्ज टनांवरून 2050 पर्यंत 3.8 अब्ज टन पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.योग्य कचरा वर्गीकरणाशिवाय यातील बहुतांश भाग हा उघड्यावर जाऊन साचतो व यामुळे हवा,माती आणि पाण्याच्या प्रदूषणात भर पडते.याचे परिणाम गंभीर असून पाण्याची ढासळत चाललेली गुणवत्ता,श्वसनाचे आजार,संसर्ग व इतर गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोक...