जागरूकता व कृतीतून साकारूयात स्वच्छ शहर

आपल्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान  बनले आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी योग्य मुल्यांसह - जागरूकता,आत्म-परीक्षण आणि सहकार्याने आपण खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतो.  अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या नवव्या सत्रात या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमात स्वच्छ,हरित भविष्यासाठी काम करणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या होत्या.

क्लीन सिटी टॉक्स हा एपीसीसीआयचा उपक्रम आहे. या माध्यमातून नेतृत्वाचे विविध पैलू शोधून, आपल्या शहराला अधिक चांगले व राहण्यायोग्य बनवण्यासाठी आपण सर्वजण काय करू शकतो,यावर चर्चा केली जाते.

याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे,लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन यांसह स्वच्छतादूत आणि टीम सदस्य उपस्थित होते.

महेंद्र लोहकरे,राजेश जाधव,विजय नांदगावकर,श्रीकांत लोहकरे,अप्पा भोंडवे आणि अनिल गायकवाड या लायफिट एरिनाच्या सदस्यांनी त्यांच्या के2एस कात्रज ते सिंहगड शर्यतीमधून मिळालेल्या अनुभवांचे प्रभावी विचार मांडले. कठिण व खडकाळ भूप्रदेशातून प्रवास करताना त्यांनी नैसर्गिक वातावरणात योग्य कचरा व्यवस्थापन पध्दतींची गरज अधोरेखित केली.

 द व्हॉएजरच्या  संस्थापक दीपाली सिंधुतेज आणि सहकारी आशुतोष कराळे या प्रेरणादायी ठरलेल्या युवांनी स्वच्छता मोहिम व हेरिटेज ट्रेकमध्ये केलेल्या प्रभावी कार्याची माहिती व अनुभवाचे सादरीकरण केले.

Popular posts from this blog

Environmental Health: Safeguarding Our Future, Sustaining Our Planet

जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व

When young minds take their ideas from ‘Mind to Market’