जागतिक स्वच्छता दिन 2025 : वापरात नसलेल्या कपड्यांचा कचऱ्याचा ढीग होण्यापेक्षा दुरूस्ती व पुर्नवापर हाच योग्य मार्ग
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात फॅशनचे नवनवीन ट्रेंड पाहता लोकांची नवी
उत्पादने,नवे फॅशनचे कपडे,वस्तू घेण्याकडे व अद्ययावत राहण्याकडे कल दिसून
येतो. परंतु आपण क्वचितच हे लक्षात घेतो की, जुन्या वस्तू टाकून देण्याची
गरज नसते. या वस्तू पुन्हा दुरूस्त,पुनर्निमित किंवा पुनर्वापर करून आपण
स्वत:साठी उपयोगात आणू शकतो किंवा त्याचे दान करून इतरांना त्याचा फायदा
होऊ शकतो. हीच संकल्पना जागतिक स्वच्छता दिन 2025 (20 सप्टेंबर) चा मुख्य
गाभा आहे.
यावर्षीची संकल्पना टॅकलिंग टेक्स्टाईल ॲन्ड फॅशन वेस्ट
थ्रू सर्क्युलर फॅशन ही आहे. ही संकल्पना फॅशन उद्योगातून निर्माण होणाऱ्या
कापड कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष केंद्रित करते. या संकल्पनेतून नवीन कपडे
घेताना शाश्वतेचा विचार करणे, पुनर्वापर करणे आणि स्वच्छ,अधिक शाश्वतशहरी
वातावरण निर्माण करणाऱ्या शाश्वत पध्दतींना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात
आला आहे.
शाश्वततेचा विचार न केल्यास न वापरलेल्या कपड्यांचा
कचऱ्याचा ढीग तयार होऊ शकतो आणि हेच आजकाल दिसून येत आहे,ही चिंतेची बाब
आहे.जगात दरवर्षी सुमारे 92 दशलक्ष टन कचरा कपड्यांमुळे निर्माण होतो.साल
2000 ते 2015 पर्यंत कपड्यांचे उत्पादन दुप्पट झाले,परंतु कपड्यांचा सरासरी
वापराचा कालावधी 36 टक्क्यांनी कमी झाला. (स्त्रोत : यूएनईपी)
आपण कसे योगदान देऊ शकतो
थ्री आर नियम पाळा : रिड्युस,रियुज,रिसायकल
कपडे
टाकून देण्यापूर्वी विचार करा : जुने कपडे दुरूस्त केले जाऊ शकतात किंवा
त्याचा वापर इतर उपयुक्त गोष्टीत केला जाऊ शकतो.उदा.स्वच्छता करण्यासाठी.
दान करा : चांगल्या स्थितीत असलेले कपडे स्वयंसेवी संस्था किंवा गरजूंना द्या.
स्मार्ट खरेदी करा : मजूबत,दीर्घकाळ टिकणारे आणि पुर्नवापर करण्यायोग्य कपडे निवडा.
छोट्या
गोष्टींनी सुरूवात केल्यास एकत्रितपणे आपण मोठा बदल घडवू शकतो. आपण जितका
कमी अपव्यय करू, तितके कचरा कुंड्यांवरील भार कमी करू शकतो आणि आपली पृथ्वी
स्वच्छ व निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो.