पर्यावरणाची काळजी म्हणजे आपल्या स्वत:ची काळजी
उत्पादन आणि संसाधनांचा वाढता वापर,कचऱ्याचे वाढते प्रमाण,योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाटाबाबत जागरूकतेचा अभाव आणि या सर्व गोष्टींमुळे जमीन,हवा आणि पाण्यामध्ये होणारे प्रदूषण हे आजच्या काळाचे वास्तव आहे.आपल्या पर्यावरणाचे आरोग्य ही आजची गंभीर समस्या असून आपल्या आरोग्यापासून ती वेगळी करता येणार नाही.खरंतरं 26 सप्टेंबर रोजी असणारा जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस पृथ्वीच्या आरोग्याशी आपले आरोग्य कसे जोडलेले आहे,हे अधोरेखित होते. चुकीचे कचरा व्यवस्थापन ही पर्यावरणाच्या दृष्टीने आजच्या काळातील सर्वांत गंभीर समस्या आहे.कचऱ्याचे साठणारे ढीग,कचरा जाळण्याची समस्या,प्लास्टिकमुळे नदी व समुद्रामध्ये होणारे प्रदूषण या सर्व बाबींमुळे पर्यावरणाची कल्पनेपलीकडे हानी होत आहे.याचा परिणाम म्हणजे दूषित माती,प्रदूषित पाणी,हानीकारक वायू,विविध आजारांसाठी पोषक वातावरण असून याचा मानवी आरोग्यावर लक्षणीयरित्या परिणाम होत आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर,प्लास्टिकच्या अतिवापराने वन्य जीवनावर आणि आपल्या अन्न साखळीवर हानीकारक परिणाम होतो.त्याचे कारण प्लास्टिकचे विघटन व्हायला शेकडो वर्ष लागतात.असेच आणखी एक उदाहरण म्...