Posts

Showing posts from March, 2025

एपीसीसीआयचा पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटमध्ये सहभाग

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर (एमसीसीआयए) तर्फे पुण्यामध्ये नुकतेच पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते.या दोन दिवसीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील उद्योग नेतृत्व आणि धोरणकर्ते सहभागी झाले होते.या परिषदेनिमित्त आयोजित प्रदर्शनात अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने एका विशेष पॅव्हेलियनद्वारे आपल्या सेवांचे सादरीकरण करत सहभाग घेतला. यानिमित्त कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता याबाबत एपीसीसीआयच्या प्रतिनिधींनी भेट देणाऱ्या लोकांशी संवाद साधला. भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असताना वस्तूंचा वापर देखील लक्षणीयरित्या वाढत आहे आणि म्हणूनच प्रभावी कचरा व्यवस्थापनाला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे. हे आव्हान लक्षात घेत एपीसीसीआय तर्फे जनसामान्य आणि उद्योग नेतृत्वामध्ये विविध उपक्रमांद्वारे सातत्याने जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटमधील सहभाग हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या परिषदेच्या माध्यमातून विविध उद्योग तज्ञांशी शाश्वतता या विषयावर संवाद साधता आला. एपीसीसीआय पॅव्हेलियनला भेट देणाऱ्या ...

प्रतिबंध आणि तत्परतेला चालना देणारी कार्यशाळा

Image
कामाच्या प्रत्येक ठिकाणी किंवा कामाच्या वातावरणात काही ना काही प्रकारची जोखीम असतेच,मात्र त्यात सर्वांत सामान्य जोखीम म्हणजे आगीच्या घटना. त्यामुळेच अशा घटनांना सामोरे जाण्याचे कौशल्य शिकणे आणि कोणत्याही मनुष्याला किंवा मालमत्तेला इजा होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने आवश्यक कौशल्यांसह सर्व टीम सदस्यांना सुसज्ज करण्याच्या उद्देशाने आपल्या स्वच्छता दूतांसाठी दोन अग्निसुरक्षा कार्यशाळांचे आयोजन केले होते. यामध्ये पहिली कार्यशाळा ही हडपसर येथील अदर इस्टेट पार्किंग आणि दुसरी कार्यशाळा येरवडा येथे पार पडली. आगीपासून बचाव,आपात्कालीन स्थितीत प्रतिसाद आणि वैयक्तिक सुरक्षा उपायांबद्दल स्वच्छतादूतांना प्रशिक्षित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे,जेणे करून,आगीशी संबंधित संभाव्य घटनांपासून ते स्वत:चे आणि समुदायाचे संरक्षण करू शकतील. हडपसर मधील काळे बोराटे नगर येथील स्टेशन ड्युटी ऑफिसर अनिल गायकवाड आणि येरवडा येथील संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली,टीमने विविध प्रकारच्या आगीच्या घटनांचा सामना करणे,अग्निशामक उपकरणे हाताळणे,उ...