हरित भविष्यासाठी करूया सहकार्य

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या आठव्या सत्रात शाश्वत भविष्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या होत्या. या सत्रात वृक्षाथॉन फाऊंडेशनचे सदस्य संतोष मोरे आणि विजय गायकवाड,तसेच माझा महाराष्ट्र मिशनचे युवा पर्यावरणप्रेमी प्रत्युष संचेती उपस्थित होते. शाश्वततेच्या क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी या दोन्ही संस्थांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, एपीसीसीआयच्या  तांत्रिक विभागाचे सरव्यवस्थापक आशिष मराठे, लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन आणि इतर सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमात समुदाय-चलित शाश्वततेच्या प्रयत्नांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. लोकप्रिय वार्षिक मॅरेथॉन असलेली वृक्षाथॉन ही तंदुरूस्तीच्या पलीकडे जाऊन सहभागींना स्थानिक झाडे लावण्यास प्रोत्साहित करून पर्यावरणीय जबाबदारीचा महत्त्वपूर्ण संदेश देते. तर दुसरीकडे माझा महाराष्ट्र मिशन हे स्वच्छता मोहिम आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी युवकांच्या सहभागावर लक्ष केंद्रित करते. एपीसीसीआयने या युवकांना स्वच्छता भागीदार म्हणून आपल्या पहिल्याच कार्यात पाठिंबा दिला आहे.

अशा प्रकारच्या प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छ,हिरवेगार शहर सर्वांच्या सहकार्याने निर्माण होऊ शकते,हा महत्त्वाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

नेतृत्व आणि शाश्वततेचे विविध पैलू तज्ञांकडून जाणून घेणे हे क्लीन सिटी टॉक्सचे उद्दिष्ट आहे

Popular posts from this blog

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

Inspiring Collaboration for a Greener Tomorrow