स्वच्छ शहरासाठी तरुण स्वयंसेवकांच्या परिवर्तनकारी संकल्पना

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या अकराव्या सत्रात तरूणांनी स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहराच्या दिशेने परिवर्तनकारी संकल्पना मांडल्या. या कार्यक्रमात बीपीटी सेवाच्या (बाणेर पाषाण टेकडी) सदस्यांनी सहभाग घेतला. नियमित स्वच्छता मोहिमा आणि जनजागृती अभियानांद्वारे शहराच्या स्वच्छतेसाठी कार्यरत असलेला हा गट आता जबाबदारी आणि सामूहिक कृतीचे प्रतीक ठरला आहे.

शांती सक्सेना, तनिष सक्सेना, अर्घव चौधरी, तेज पुंडे, अर्णव नायर, सुझॅन थॉमस आणि आदित बागडे या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या या उपक्रमाने नागरिकांमध्ये जबाबदारी व सामुहिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनिक ठिकाणांकडे होणारे दुर्लक्ष हे अनेकदा नागरी शिस्तीचा अभावामुळे होते. शाश्वत व दीर्घकालीन बदल घडवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे या स्वयंसेवकांनी नमूद केले. शाश्वतता ही वैयक्तिक आणि स्थानिक प्रयत्नांपासूनच सुरू होते हे त्यांनी अधोरेखित केले.

एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, सरव्यवस्थापक आशिष मराठे आणि लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन यांनी या युवा गटाच्या समर्पण आणि नेतृत्वगुणांचे कौतुक केले. बीपीटी सेवा सारख्या युवक-प्रेरित उपक्रमांमुळे व समुदायाच्या प्रयत्नातून शहर अधिक स्वच्छ, अधिक राहण्यायोग्य आणि सुंदर बनण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे.

Popular posts from this blog

Volunteering Communities of Pune: MyPrakriti’s Growing Movement for a Cleaner City

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

स्वच्छता सैनिक मेळावा 2025 : समर्पण, संघभावना आणि सामायिक ध्येयाचा उत्सव