जागतिक वसुंधरा दिवस - पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची

दरवर्षी जगभरात 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. 2009 मध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने मंजूर केलेल्या ठरावानुसार हा दिवस इंटरनॅशनल मदर्स डे म्हणून घोषित करण्यात आला आहे.यावर्षीची संकल्पना अवर पॉवर,अवर प्लॅनेट असून अक्षय्य उर्जा कडे वाटचालीला अधिक बळ देणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांचा व सामूहिक सहभाग याबाबत जागरूकतेवर भर देते.

पृथ्वी हे आपले एकमेव घर आहे,पण याच आपल्या पृथ्वीला अनेक पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.त्यातलीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे कचरा व्यवस्थापन. जशी प्रगती होत आहे,तसाच वस्तूंचा वापर देखील वाढत आहे आणि परिणामी कचरा देखील वाढत आहे.याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्याची समस्या अधिक तीव्र होते, प्रदूषण वाढते. याचीच अनुभूती आपल्याला रोज येत आहे.प्रक्रियेअभावी कचऱ्यामुळे माती,पाणी आणि हवा हे तीनही आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक प्रदूषित होत आहेत.याचा थेट परिणाम सभोवतालची परिसंस्था आणि मानवी आरोग्यावर होत आहे.या सर्वाचा परिणाम जैवविविधतेवर आणि हवामानावर होत आहे.

या सर्व समस्यांचा डोंगर असला तरी ही परिस्थिती बदलणे शक्य आहे.मात्र त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग म्हणजे मोलाचे योगदान ठरू शकते.या सर्व समस्यांचे मूळ हे आपल्या घरातूनच सुरू होते आणि ते म्हणजे कचरा वर्गीकरण.काही सोप्या आणि सहज करता येणाऱ्या कृतींमुळे या समस्येवर आपण सामुहिक प्रयत्नांनी मात करू शकतो. त्यासाठी घरी साचणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका या दोन्ही प्रकारात वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे.त्याचबरोबर स्वयंपाक घरात खाद्यपदार्थांशी निगडीत कचऱ्याचे कंपोस्ट करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.या साध्या कृतींमुळे उघड्यावर साचणारा कचरा कमी होऊ शकतो आणि वर्गीकरण केल्यामुळे अधिक कार्यक्षमतेने त्यावर फेरप्रक्रिया होऊ शकते.प्रत्येक घरात ही सवय प्रत्यक्षात आल्यास आपण अधिक स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू शकतो.जागतिक वसुंधरा दिवस अशाच उपाययोजनांवर प्रकाश टाकण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

Popular posts from this blog

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

Environmental Health: Safeguarding Our Future, Sustaining Our Planet

Different Paths, One Goal – Sustainability