पुण्यातील स्वच्छता स्वयंसेवी समुदाय : स्वच्छ शहरासाठी मायप्रकृतीची मोहिम

पुण्यात स्वच्छतेसाठी अनेक नागरिकांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जातात. अशाच अर्थपूर्ण बदल घडवून आणणाऱ्या उपक्रमांपैकी एक म्हणजे मायप्रकृती. हा विद्यार्थ्यांनी आणि तरुण व्यावसायिकांनी स्थापन केलेला एक उत्साही पर्यावरणप्रेमी समुदाय आहे. हा युवा गट  पुणे शहर अधिक स्वच्छ आणि हरित करण्यासाठी कार्यरत असून समर्पितपणे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी स्वच्छता उपक्रम राबवत आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे, या विचारातून नोव्हेंबर 2025 मध्ये आठ मित्रांच्या एका लहान गटाने मायप्रकृती या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला संस्थापकांनी डिजिटल माध्यमांतून पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला. मात्र, नागरिकांबरोबर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे,असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यातून पुण्यात साप्ताहिक स्वच्छता मोहिमांची त्यांनी सुरुवात झाली.

अवघ्या सहा महिन्यांत या उपक्रमाचे रूपांतर एका सक्षम आणि सक्रीय समुदायात झाले असून आतापर्यंत सुमारे 30 स्वच्छता मोहिमा यशस्वीरित्या राबविण्यात आल्या आहेत. कचरा संकलनाबरोबरच मायप्रकृती कचरा व्यवस्थापन, नदी प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास आणि पर्यावरण पुनरूज्जीवनाची गरज यांसारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंसेवकांची वचनबध्दता. आठवडाभराचे काम आणि अभ्यासाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून हे स्वयंसेवक स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने योगदान देण्यासाठी साप्ताहिक सुट्टीचा दिवस निवडतात. अनेक सहभागी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव व माहिती आपल्या मित्रांना सांगतात आणि पुढील मोहिमांमध्ये नवीन स्वयंसेवकांना सहभागी करून घेतात. यामुळे पर्यावरणा बाबत जागरूकता अधिक व्यापक प्रमाणावर पोहोचत आहे.

नागरिकांना प्रत्यक्ष योगदान देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत हा गट एकावेळी एक स्वच्छता अशा मोहीमेद्वारे स्वच्छतेसाठी काम करत आहे. पर्यावरणीय आव्हानांवर मात करण्यासाठी आणि जबाबदार कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) या उपक्रमाच्या सुरूवातीपासूनच मायप्रकृतीच्या स्वच्छता मोहिमांना पाठिंबा देत आहे.सर्व एकत्र आल्यास अधिक व्यापक प्रमाणावर सकारात्मक प्रभाव पाडण्यास शक्य होईल व शहर अधिक स्वच्छ राहण्यास मदत होईल.




Popular posts from this blog

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

Inspiring Collaboration for a Greener Tomorrow