'माझी वारी, स्वच्छ वारी' - लोकसहभागातून साकार होणारे स्वच्छतेचे प्रेरणादायी अभियान

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या 'माझी वारी स्वच्छ वारी' या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर सुमारे १४० किमी रस्ता पालखी प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आला. १,४०० हून अधिक स्वयंसेवक,अनेक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या सांघिक कार्यामुळे ९ जुलै ते १३ जुलै २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत सुका कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे



यासाठी
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह बरोबरच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी,उरुळी कांचन, वडकी,कदमवाक वस्ती, दिवे काळेवाडी, झेंडेवाडी, यवत येथील ग्रामपंचायत, तसेच सासवड व फुरसुंगी नगरपरिषद, खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यासह गावांमधील स्वयंसेवक यांच्या सांघिक कार्यातून पालखीच्या मार्गांवर काही तासांतच रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविली जाते.यामध्ये २४ स्वयंसेवी गट आणि स्वयंसेवी संस्था, कंपन्या व शाळांसह २५ संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.



स्वयंसेवकांना सहजरित्या कचरा गोळा करून ठेवता यावा यासाठी एपीसीसीआय तर्फे पालखी मार्गावर ५० ग्रीन नेटस बसविण्यात आले. तसेच १६७ हून अधिक कचरा वेचक वाहने आणि मशिन सेवेत कार्यरत होत्या. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हच्या टीमने सर्व ग्रामपंचायत आणि स्वयंसेवकांमध्ये प्रत्यक्ष भेटी आणि व्हॉट्सॲपच्या मार्फत समन्वय साधण्याचे काम केले. स्वतंत्रपणे गोळा करण्यात आलेल्या सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पेपर कप इत्यादींचा समावेश होता. स्वयंसेवकांना प्लॉगिंग बॅगसह साफसफाईसाठी आवश्यक स्वच्छता साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.



 विविध सामाजिक व इतर संस्था हे या मेहिमेमध्ये दरवर्षी मोलाचे योगदान देत आहेत.यामध्ये मोझे स्कुल,कृषी महाविद्यालय,महिंद्रा टेक कंपनी,सणस संस्था, कर्मयोगिनी महिला ग्रुप हडपसर, विश्व हिंदू परिषद,शंभो महादेव प्रतिष्ठान,राजे ग्रुप,पर्यावरण संरक्षण समिती,सुदर्शन युवा फाउंडेशन,ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन,एकात्मिक बालविकास सेवा योजना,उरुळी कांचन ग्रामस्थ,शिवनेरी उद्योग समूह,साबळे कॉलेज,राष्ट्रसेवा दल ,संत सोपानकाका सहकारी बँक,शिव चैतन्य अकॅडमी,कऱ्हामाई फाऊंडेशन,सकाळ मीडिया ग्रुप, ढोले पाटील जुनिअर कॉलेज,कदमवाक वस्ती,ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय, एएसआर सर्व्हिसेस आणि सुमित फॅसिलिटीज  यांचा समावेश आहे.



 मागील पंधरा दिवसांपासून स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यासाठी या सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करून संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती तसेच सुमारे १,४००  हून अधिक स्थानिक स्वयंसेवकांसह एपीसीसीआयच्या २८० स्वयंसेवकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला होता. अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह मार्फत सर्व स्वयंसेवकांना कचरा संकलनासाठी पिशव्या, ग्लोव्हज् आणि वाहने पुरवण्यात आली.
 हे अभियान अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, सरव्यवस्थापक आशिष मराठे आणि लीड वॉलेंटियर सत्या नटराजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.तसेच एपीसीसीआयचे सर्व व्यवस्थापक आणि सुपरवायझर यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Popular posts from this blog

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

Inspiring Collaboration for a Greener Tomorrow