निसर्ग संवर्धनाची सुरूवात आपल्या घरापासून

झाडे लावणे किंवा वन्यजीवनाचे संरक्षण करणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.परंतु निसर्ग संवर्धनाची सुरूवात प्रत्येक व्यक्तीपासून होते. आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित भाग म्हणजे आपण निर्माण करत असलेला कचरा. त्याचे व्यवस्थापन आपण कसे करतो यातूनच निसर्ग संवर्धनाची सुरूवात होते.

कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावल्याने जमीन,पाणी आणि हवा या निसर्गाने आपल्याला दिलेल्या तीनही मौल्यवान गोष्टी प्रदूषित होत आहेत.त्याचा परिणाम पर्यावरणाबरोबरच आपल्या आरोग्यावरही होत आहे.योग्य कचरा व्यवस्थापन झाल्यास प्रदूषण कमी करण्यात,निसर्ग संवर्धनाचे जतन करण्यात आणि स्वच्छ व निरोगी परिसर निर्माण करण्यात मदत होईल.या सर्व गोष्टींचा विचार केला तर शाश्वत भविष्याच्या दिशेने पहिले पाऊल आपल्या घरापासूनच सुरू होते.

आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या सवयी मोठा बदल घडवू शकतात.आपण काही सोप्या पण महत्त्वपूर्ण गोष्टी नक्कीच करू शकतो.त्यातील सर्वात साधी व तुलनेने सोपी बाब म्हणजे घरच्या घरीच ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण करणे.स्वयंपाक घरातील निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करून बाहेर उघड्यावर (लँडफील) जमा होणारा कचरा आपण कमी करू शकतो.तसेच झाडांसाठी नैसर्गिक खत या माध्यमातून तयार होऊ शकते.एकदाच वापरल्या जाऊ शकणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर,पुनर्वापर करता येणारे डबे हे आपल्या रोजच्या जीवनातील सवयीचा भाग झाला पाहिजे.कमी पॅकेजिंग असलेल्या वस्तूंची निवड केल्यास आणि गरजेपुरत्याच वस्तू खरेदी केल्यास त्याचा पर्यावरणाला नक्कीच फायदा होऊ शकतो.हे आपण करत असताना आजूबाजूचे मित्र परिवार,स्नेही आणि कुटुंबियांनाही या सवयींसाठी प्रोत्साहित केल्यास व्यापक बदल घडू शकतो.

आपल्या पुणे शहरात पर्यावरण संवर्धनासाठी अनेक प्रेरणादायी उपक्रम विविध संस्था राबवत आहेत.निसर्ग आणि शाश्वततेप्रती त्यांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे क्लीन सिटी टॉक्स हा उपक्रम सुरू करण्यात आला.यामध्ये पर्यावरण तज्ञ,या क्षेत्रात कार्यरत असलेले स्वयंसेवक हे त्यांचा अनुभव व वास्तविक उपाययोजना सांगत इतरांना प्रोत्साहित करतात.या उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी leadv@adarpcleancity.com या ईमेल वर संपर्क साधावा.

Popular posts from this blog

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

Volunteering Communities of Pune: MyPrakriti’s Growing Movement for a Cleaner City

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..