जागतिक पर्यावरणीय आरोग्य दिन 2026

निरोगी पर्यावरण हाच आरोग्यदायी जीवनाचा आधार आहे -  आपण व्यक्ती म्हणून काय योगदान देऊ शकतो?  


पर्यावरणीय आरोग्य हा आजच्या काळातील सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सर्वांत गंभीर समस्यांपैकी एक बनली आहे. हवामान बदल,  पूर, दुष्काळ व जंगलातील वणवे यांसारख्या गंभीर हवामानविषयक घटनांमुळे समाज आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहे. त्याचबरोबर वायू प्रदूषणाचा त्रास अब्जावधी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, तर पाण्याची टंचाई आणि पाणी दूषित होण्याच्या समस्यांमुळे सुरक्षित पाणी मिळण्यावर धोका निर्माण झाला आहे. मायक्रोप्लास्टिक्सचा वाढता प्रादुर्भाव तसेच प्लास्टिक आणि रासायनिक कचऱ्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणीय परिसंस्थांसमोर आणखी धोके निर्माण झाले आहेत. बदलत्या हवामान बदलांमुळे कीटकांंमार्फत पसरणाऱ्या आजारांचा प्रसारही वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणीय आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. म्हणूनच 26 सप्टेंबर 2026 रोजी साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरणीय आरोग्य दिन विशेष महत्त्वाचा आहे.

कचरा व्यवस्थापनाचा या पर्यावरणीय आरोग्यविषयक आव्हानांशी जवळचा संबंध आहे. योग्य पद्धतीने व्यवस्थापन न झालेल्या कचऱ्यामुळे माती आणि पाणी प्रदूषित होऊ शकते. कचरा उघड्यावर जाळल्यामुळे वायू प्रदूषण वाढू शकते, तसेच कीटक आणि रोगवाहकांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्लास्टिक कचरा जलस्रोतांमध्ये जाऊन त्याचे विघटन होऊन मायक्रोप्लास्टिक्स तयार होऊ शकते. प्रक्रिया न केलेला जैविक आणि घातक कचरा मानवी आरोग्य तसेच पर्यावरणासाठी गंभीर धोके निर्माण करू शकतो. कचऱ्याच्या स्त्रोतावरच कचऱ्याचे वर्गीकरण करण्यापासून सुरू होते. प्रदूषण कमी करण्यास, स्वच्छता सुधारण्यास आणि विविध प्रकारच्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया, पुनर्वापर किंवा विल्हेवाट करण्यास मदत करू शकते.

आपण व्यक्ती म्हणून काय करू शकतो?

1. घरातील कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करा.

2.अनावश्यक एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळा.
शक्य तिथे वस्तूंचा पुनर्वापर करा आणि पुनर्वापरयोग्य साहित्य रिसायकलिंगसाठी द्या.

3.स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करा. तसेच घातक कचरा अधिकृत कचरा संकलन केंद्रांकडे सोपवा.

4. सार्वजनिक ठिकाणे आणि घराचा परिसर कचरामुक्त ठेवा.

पर्यावरणीय आरोग्याची सुरुवात आपण दररोज घेत असलेल्या निर्णयांपासून होते.

Popular posts from this blog

Volunteering Communities of Pune: MyPrakriti’s Growing Movement for a Cleaner City

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

स्वच्छता सैनिक मेळावा 2025 : समर्पण, संघभावना आणि सामायिक ध्येयाचा उत्सव