समाजातील सुव्यवस्थेमध्ये स्वछतेची महत्वाची भूमिका - डॉ. संदीप भाजीभाकरे
शिस्त, स्वच्छता आणि आपले स्वच्छतादूत: एका गौरवास्पद प्रवासाची गाथा
शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ रोजची जबाबदारी नसून ती समाजाप्रती असलेली एक महत्त्वाची सेवा आहे. ऊन, पाऊस असो वा दिवस-रात्र, आपल्या कामाशी एकनिष्ठ राहत पुण्याचे रस्ते स्वच्छ राखण्यामध्ये 'आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह' (एपीसीसीआय) तर्फे आपल्या स्वच्छता सैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नुकताच वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात एक विशेष कार्यक्रम पार पडला.
या सोहळ्यात पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त (डीसीपी) डॉ. संदीप भाजीभाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वच्छता सैनिकांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे किंवा स्वच्छतेच्या बाबतीत जेव्हा आम्ही यांना फोन करतो, तेव्हा ही टीम अत्यंत तत्परतेने प्रतिसाद देत २४ ते ४८ तासांच्या आत समस्या मार्गी लावते. या कार्यक्रमादरम्यान, डॉ. भाजीभाकरे यांनी योगदानाबद्दल आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह'च्या टीमला सन्मानपत्र देखील प्रदान केले.
आपल्या भाषणादरम्यान, डॉ. भाजीभाकरे यांनी शहरी स्वच्छता आणि सामाजिक सुव्यवस्था यांच्यातील साम्य याबद्दल बोलले. समाजातील सुव्यवस्थेमध्ये स्वछतेची भूमिका महत्वाची आहे ," असे सांगत डॉ. भाजीभाकरे यांनी या उपक्रमाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. त्यांनी पुढे नमूद केले की, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दाखवलेली बांधिलकी ही केवळ भौतिक स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजाला शिस्तीचा एक आदर्श घालून देते. समाजामध्ये स्वच्छतेच्या कामाबद्दल कृतज्ञता आहे असे ते म्हणाले .
या कार्यक्रमात सुमारे ६५० स्वच्छता सैनिक , सुपरवायझर्स आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या सहकाऱ्यांच्या कामाचा अभिमानाने गौरव केला. विशेष म्हणजे, सुमारे ३३ स्वच्छता सैनिकांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. कचरा संकलनादरम्यान सापडलेल्या मौल्यवान वस्तू प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणे असो किंवा सार्वजनिक ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय प्रसंगी नागरिकांच्या मदतीला धावून जाणे असो, या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे
एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मल्हार करवंदे आणि सल्लागार कृष्णन कोमंडूर यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा म्हणजे यास्वच्छता सैनिकांच्या निष्ठेला मानवंदनाच आहे!
.jpg)